संपर्क करा

शून्यातून शिखराकडे – संदीप परदेशी यांची जीवनगाथा

शून्यातून शिखराकडे – संदीप परदेशी यांची जीवनगाथा

                बालवयातच आई-वडिलांचे छत्र हरपलेले संदीप गोपालदास परदेशी यांनी आपल्या कठीण संघर्षातून जीवनाला नव्याने आकार दिला. वयाच्या लहानशा टप्प्यावर चहाच्या दुकानावर काम करत त्यांनी जीवनाची सुरुवात केली. नंतर अनेक छोट्या-मोठ्या कामांतून त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह चालवला आणि अनुभवांचा मोठा ठेवा जमा केला.

फकिरा शेठ या पिढीवाल्याच्या मार्गदर्शनाने त्यांच्या कार्यक्षमतेला ओळख मिळाली. कामातील प्रामाणिकपणा, चिकाटी आणि हुशारी पाहून त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. या टप्प्यावरून त्यांनी स्वतःचा आत्मविश्वास उंचावला आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःचे अस्तित्व निर्माण केले.

कष्ट आणि जिद्द यांच्या बळावर त्यांनी बंगला, गाडी, प्रतिष्ठा मिळवली; पण या सर्व गोष्टींपेक्षा त्यांची खरी संपत्ती म्हणजे त्यांची माणसं. जात-पात, धर्म भेद न करता सर्वांशी समतेने वागणारा, गरजूंना मदतीचा हात देणारा, आणि अनेकांचे खरे मित्र ठरणारा असा हा हनुमान भक्त कार्यकर्ता!

तळोदा शहरातील अनिता परदेशी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन कन्या आहेत आणि या मुलींसाठी ते प्रेरणादायी वर्तन ठेवत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.

आपण लहानपणी समाजाच्या आधाराने उभे राहिलो, ही कृतज्ञतेची भावना संदीप परदेशी यांनी नेहमी जपली. त्यामुळेच समाजासाठी काही तरी करण्याची ऊर्जा त्यांच्या ठिकाणी सतत जागी राहिली. याच भावनेतून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मुस्लिम बहुल प्रभाग क्रमांक २ मधून हितेंद्र क्षत्रिय व त्यांच्या पत्नी यांना निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता.

एक सक्रिय नगरसेवक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. नविन उपक्रम राबवण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यशैलीने स्वतःची स्वतंत्र छाप उमटवली आहे.

         हितेंद्र क्षत्रिय, योगेश मराठे यांच्या सोबत त्यांच्या राजकारणात प्रवेश केला. गणेश सोशल ग्रुप या माध्यमातून समाजकार्य सुरू केले. या काळात त्यांना अनेक जिवाभावाचे मित्र लाभले, जे त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सोबत राहिले.

    राजकारणाच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करत असताना त्यांनी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादामुळे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तिथे विविध पदे भूषवून कार्यकर्त्यांतून नेता घडवणारे कार्य केले. पुढे बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी असलेले कौटुंबिक संबंध व आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी समाजकार्यात सातत्य ठेवले आहे.

       संदीप परदेशी यांचे जीवन म्हणजे संघर्षातून घडलेला कार्यकर्ता. शून्यातून विश्व निर्माण करणारे असे व्यक्तिमत्त्व आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते..

सुधाकर मराठे

0 Response to "शून्यातून शिखराकडे – संदीप परदेशी यांची जीवनगाथा"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article