संपर्क करा

शहादा-तळोदा मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिलासा; समशेरपूर कारखान्याच्या थकीत रकमेबाबत आमदार राजेश पाडवींचे तातडीचे पाऊल

शहादा-तळोदा मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिलासा; समशेरपूर कारखान्याच्या थकीत रकमेबाबत आमदार राजेश पाडवींचे तातडीचे पाऊल

तळोदा : शहादा-तळोदा मतदारसंघातील अनेक शेतकरी समशेरपूर साखर कारखान्याकडून थकीत रकमेच्या प्रश्नाने त्रस्त होते. गेल्या काही काळापासून कारखान्याने शेतकऱ्यांचे उसाचे पैसे थकवले असून, त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काही शेतकऱ्यांनी आमदार राजेश पाडवी यांची भेट घेतली आणि आपली तक्रार त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

         तक्रारीची गंभीर दखल घेत आमदार पाडवी यांनी तातडीने समशेरपूर कारखान्याचे व्यवस्थापकीय अधिकारी पद्माकर टापरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे निर्देश त्यांनी कारखान्याला दिले. या संवादात टापरे यांनी आश्वस्त केले की, येत्या १० मे २०२५ पर्यंत सर्व थकीत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील.

         शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला वेळेत मिळावा, यासाठी उचललेले तातडीचे पाऊल कौतुकास्पद ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.

               समशेरपूर कारखान्याकडून वेळेवर पैसे मिळाल्यास आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक तयारी करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे या निर्णयाला ग्रामीण भागात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

0 Response to "शहादा-तळोदा मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिलासा; समशेरपूर कारखान्याच्या थकीत रकमेबाबत आमदार राजेश पाडवींचे तातडीचे पाऊल"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article