पोलीस पाटील विजय कोठारी यांचा सन्मानपूर्वक निरोप समारंभ संपन्न
तळोदा – चौगाव खुर्द येथील ज्येष्ठ पोलीस पाटील विजय हुरजी कोठारी यांनी तब्बल 32 वर्षे प्रामाणिक सेवा बजावल्यानंतर आज सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या सन्मानार्थ आज तळोदा पोलीस ठाण्यात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
समारंभास पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी विजय कोठारी यांच्या कार्यकाळातील योगदानाची प्रशंसा करत त्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सेवा काळात त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने बोलताना विजय कोठारी यांनी पोलीस दलाच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि गावकऱ्यांच्या विश्वासास पात्र राहण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले, तर आभारप्रदर्शन स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केले.
0 Response to "पोलीस पाटील विजय कोठारी यांचा सन्मानपूर्वक निरोप समारंभ संपन्न"
टिप्पणी पोस्ट करा