मोलगी येथे नेताजी सुभाष चंद्र जयंती व कॉपीमुक्त अभियान कार्यक्रम संपन्न
अक्कलकुवा : तालुक्यातील मोलगी येथील ग्रामविकास मंडळ संस्था संचलित प्रा. बी. एस. सैंदाणे कला व विज्ञान कनिष्ठ विद्यालयात नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती, पालक मेळावा व कॉपीमुक्त अभियान उपक्रम साजरा करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मोलगी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच श्रीमती ज्योती तडवी, बार्टीचे धडगांव व अक्कलकुवा तालुका समतादूत ब्रिजलाल पाडवी, महाविद्यालयाचे प्राचार्य विनोद कुंवर, प्रा. धनसिंग वसावे, प्रा.प्रविण चौधरी व प्रमुख मान्यवर प्रा.रविंद्र वानखेडे, प्रा.दिनेश प्रजापती तर अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद कला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरगनसिंग पाडवी होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर प्राचार्य विनोद कुवर यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगुन प्रस्तावना केली. त्यानंतर प्रमुख अतिथी ब्रिजलाल पाडवी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे 'भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान' या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रा.मनोज चौरे यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जीवन परिचयवर सोप्या व सुंदर शब्दात मार्गदर्शन केले. तसेच प्रा.धनसिंग वसावे यांनी बारावी नंतर विद्यार्थ्यानी पुढील विविध क्षेत्रात करियर निवड करतांना आपल्या आवडीप्रमाणे निवळ करावी अशी माहिती देत कौशल्य विकास विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा.प्रविण पाटील यांनी इयत्ता बारावीच्या परिक्षा सबंधित सूचना देत विद्यार्थ्यांना पोषण व सकस आहाराविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सुभाष पाडवी,विजय पाडवी,समाधान महाजन व पालकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रविंद्र वानखेडे तर आभार प्रा.प्रविण चौधरी यांनी मानले.
0 Response to "मोलगी येथे नेताजी सुभाष चंद्र जयंती व कॉपीमुक्त अभियान कार्यक्रम संपन्न"
टिप्पणी पोस्ट करा