संजीव रमेश चौधरी यांना "अग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी पुरस्कार २०२५" ने सन्मानित
तळोदा – कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल संजीव रमेश चौधरी यांना सपत्नीक "अग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी पुरस्कार २०२५" हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चौधरी दाम्पत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय शेती, जलसंधारण, बहुपीक पद्धती आणि शाश्वत शेतीच्या माध्यमातून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांमुळे अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली असून, त्यांनी कृषी क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
मुंबई येथे पार पडलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी कृषी तज्ज्ञ, शासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. चौधरी दाम्पत्याच्या या यशाबद्दल संपूर्ण शेतकरी समुदायातून त्यांचे कौतुक होत आहे.
0 Response to "संजीव रमेश चौधरी यांना "अग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी पुरस्कार २०२५" ने सन्मानित"
टिप्पणी पोस्ट करा