अक्कलकुवा तालुका पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
अक्कलकुवा : तालुका पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षपदी आणि सचिवपदी निवड झाल्याबद्दल भाजपा माजी जिल्हाध्यक्ष आणि अक्कलकुवा विधानसभा निवडणूक प्रमुख मा. नागेशदादा पाडवी तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मा. किरसिंगदादा वसावे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा हृदय सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आणि तालुक्यातील पत्रकार संघाच्या कार्याचा गौरव केला. तसेच, आगामी काळात पत्रकार संघाकडून सकारात्मक कार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते.
0 Response to "अक्कलकुवा तालुका पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार"
टिप्पणी पोस्ट करा