मी शपथ घेताना चुकलो म्हणजे पहाड तुटला नाही" – आमदार आमश्या पाडवींचा ठाम प्रतिसाद
तळोदा : शपथविधी दरम्यान झालेल्या चुकांवरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना आमदार आमश्या पाडवी यांनी ठाम प्रतिक्रिया दिली आहे. "मी शपथ घेताना चुकलो म्हणजे आकाश कोसळलं नाही किंवा पहाड तुटला नाही," अशा शब्दांत त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं.
आमदार पाडवी यांनी या निवडणुकीत ७ वेळा विजयी झालेल्या माजी मंत्री के.सी. पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी आणि पालक मंत्री यांची कन्या तथा माजी खासदार हिना गावित यांसारख्या राजकीय दिग्गजांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
"अशा दिग्गजांचा पराभव केल्यामुळे टीका होणारच. असे त्यांचे म्हणणे असून मी टीकांवर घाबरणारा नाही. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी माझ्या कामगिरीकडे आणि जनतेच्या सेवेसाठी असलेल्या माझ्या प्रयत्नांकडे पाहावं," असे पाडवी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "शपथ घेताना झालेल्या छोट्या चुकांवरून मोठ्या गाजावाजा करण्यापेक्षा, आपण जनतेच्या प्रश्नांवर काम करण्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. माझा उद्देश हा केवळ विकासाला गती देणे आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने काम करणं आहे."
0 Response to "मी शपथ घेताना चुकलो म्हणजे पहाड तुटला नाही" – आमदार आमश्या पाडवींचा ठाम प्रतिसाद"
टिप्पणी पोस्ट करा