
तळोदा शहरातील खाद्यपदार्थांमध्ये वारंवार आढळतात अळ्या, ग्राहकांमध्ये संतापाची लाट
तळोदा : शहरातील शहादा रस्त्यावरिल एका दुकानात विक्रीस ठेवलेल्या खजूरामध्ये अळ्या आढळल्याची घटन उघडकीस आली आहे. ग्राहकांनी खरेदी केलेल्या खजुरामध्ये अळ्या दिसल्यानंतर त्यांनी संबंधित दुकान व्यवस्थापकाकडे तक्रार केली. त्यांनी डिस्ट्रीब्यूटर कडे जाण्याचा अजब सल्ला दिला. पोलिसांकडे गेलेल्या ग्राहकांना पोलिसांनीही अन्न औषध प्रशासनाकडे बोट दाखवले. ही बाब सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरभर खळबळ उडाली आहे.
तळोदा शहरातील शहादा रस्त्यावरील एका दुकानात खरेदी केलेल्या खजुराचा पाकिटात चक्क आळ्या आढळल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वीही तळोद्यातील विविध खाद्यपदार्थांमध्ये अशाच प्रकारे अळ्या आणि दूषित पदार्थ सापडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. याशिवाय याच या दुकानात त्रुटी या पेय मध्ये अळ्या आढळल्याची तक्रार समोर आली होती. ग्राहकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही या समस्येवर कोणताही ठोस उपाय करण्यात आला नाही. यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ग्राहकाने सदर प्रकार दुकान व्यवस्थापकाकडे सांगितल्यानंतर त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही याशिवाय त्यांनी डिस्ट्रीब्यूटरला भेटा असा अजब सल्ला दिला संतप्त झालेल्या ग्राहकाने पोलीस स्टेशन गाठले मात्र पोलीस ठाण्याने देखील अन्न औषध प्रशासनाकडे बोट दाखवले. त्यामुळे ग्राहक अधिकच संतप्त झाला अन् अखेर त्याने घडलेला प्रकार सोशल मीडियावर व्हायरल केला.
या घटनांमुळे ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, दोषी दुकानदारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. “सतत अशा प्रकारचे दूषित खाद्यपदार्थ विकले जात असल्याने आमच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने तातडीने पावले उचलली पाहिजेत,” असे संतोष वानखेडे या संतप्त ग्राहकाने सांगितले.
या प्रकारांबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांच्या कारवाईचा वेग अत्यंत संथ असून, दुकानांवर नियमित तपासणी होत नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.
दुकानदारांकडून मात्र या प्रकारांवर कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. काहींनी खरेदी केलेल्या मालावर दोष नसल्याचा दावा केला, तसेच आम्ही घरी पॅकिंग करत नाही, वरून माल येतो असे म्हणत तुम्ही डिस्ट्रीब्यूटर कडे जा असा अजब सल्ला दिला.
या प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करून, दोषी दुकानदारांवर कठोर दंडात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यासोबतच शहरातील सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करून अन्नसुरक्षेबाबत जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. तळोद्यातील या प्रकारांमुळे ग्राहकांमध्ये अन्नसुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. प्रशासनाने त्वरीत हालचाली न केल्यास नागरिकांचा संताप अधिक तीव्र होऊ शकतो.
0 Response to "तळोदा शहरातील खाद्यपदार्थांमध्ये वारंवार आढळतात अळ्या, ग्राहकांमध्ये संतापाची लाट"
टिप्पणी पोस्ट करा