संपर्क करा

कपाशी फवारणीच्या विषामुळे शेतकऱ्याचा मृत्यू: तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कपाशी फवारणीच्या विषामुळे शेतकऱ्याचा मृत्यू: तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तळोदा : तालुक्यातील कळमसर मोहिदा येथील 33 वर्षीय शेतकरी रामदास उध्दव चव्हाण यांनी कपाशीवर फवारणीसाठी वापरण्यात आलेले विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालय, तळोदा येथे त्यांचा मृत्यू झाला.

         रामदास चव्हाण यांची मानसिक स्थिती बिघडल्यामुळे त्यांनी विषारी औषध प्राशन केले असल्याची नोंद करण्यात आली आहे.. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय, तळोदा येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारादरम्यान सकाळी 11:30 वाजता त्यांना मृत घोषित केले.   
       श्याम उध्वद चव्हाण (वय 29, व्यवसाय: शेती, रा. कळमसर मोहिदा, यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात कलम 194 अन्वये प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजू जगताप करीत आहेत.

0 Response to "कपाशी फवारणीच्या विषामुळे शेतकऱ्याचा मृत्यू: तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article