संपर्क करा

दलेलपूर येथे बिबट्याचा हल्ल्यात ११ वर्षीय बालक ठार

दलेलपूर येथे बिबट्याचा हल्ल्यात ११ वर्षीय बालक ठार

तळोदा: दलेलपूर येथील तुरीच्या शेतात रखवाली करणाऱ्या कुटुंबावर बिबट्याने हल्ला करत ११ वर्षीय अनिल करमसिंग तडवी या बालकाला गंभीर जखमी केले. तळोदा उपजिल्हा रुग्णाल उपचार घेत असताना संध्याकाळी साडेसात वाजताची प्राणज्योत मालवली.

       ही घटना सोमवारी सायंकाळी ६:३० वाजता घडली. अनिल झोपडीतून बाहेर पडत असताना बिबट्याने अचानक बालकावर झडप घातली. सोबत असलेले तीन भाऊ गावाकडे पळत आले आणि त्यांनी आरडाओरड केली. तात्काळ शंभर ते दीडशे गावकरी लाठ्या-काठ्या घेऊन शेताकडे गेले. लोकांच्या जमाव येत असल्याचे बघून बिबट्याने तेथून पडला या घटनेत बालकाच्या डोक्यावर जबर मार लागला असून त्याची प्रकृती गंभीर होती त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
          त्याच्यावर तोडगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना अनीलची मृत्यूची सुरू असणारी त्याची झुंज अपयशी ठरली आणि संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
           दरम्यान,घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन महिन्यापूर्वी बिबट्यांच्या हल्ल्यांचे सुरू असणारे सत्र थांबल्याचे नागरिकांना वाटत होते मात्र पुन्हा एकदा बिबट्यांचे हल्ले सुरू झाल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे.
         वन विभागाने परिसरात सापळे लावण्याचे नियोजन केले असून नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन केले आहे.


0 Response to "दलेलपूर येथे बिबट्याचा हल्ल्यात ११ वर्षीय बालक ठार"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article