तळोदा : दोडे गुजर समाजाच्या दिनदर्शिकेचे दिमाखदार प्रकाशन
तळोदा : शहरातील दोडे गुजर समाजाच्या वतीने 2025 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पार पडले. या कार्यक्रमाची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरीनाथ पाटील होते, तर प्रमुख मान्यवरांमध्ये रघुवीर चौधरी (मोरवड), नटवर पाटील (धानोरा), श्रावण चौधरी (मोरवड), हिम्मत पटेल (शेलू), सुरेश पटेल (बार्डोली), केदार चव्हाण (नंदुरबार), मुकुंद पाटील (मुंबई), अरुण पाटील (तळवे), प्रकाश पाटील (निंभोरा) आणि रमाकांत पाटील (वाघोदा) उपस्थित होते.
मान्यवरांनी संपूर्ण दोडे गुजर समाज बांधवांसाठी दिनदर्शिका विनामूल्य वाटण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे समाजाच्या वतीने त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
दिनदर्शिकेच्या यशस्वी प्रकाशनासाठी तळोदा शहर दोडे गुजर समाज अध्यक्ष मुकेश पाटील, उपाध्यक्ष गोविंद पाटील, सचिव सोमनाथ पाटील, सदस्य युवराज चव्हाण, कृष्णदास पाटील, सागर पाटील आणि राहुल पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमात ज्येष्ठ समाज बांधव बन्सीलाल पाटील, राजेंद्र पाटील, हरीश पाटील, योगेश पाटील, दीपक पाटील आणि इतर अनेक समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना सोमनाथ पाटील यांनी केली, तर मनोगत प्रकाश पाटील, प्रशांत पाटील, रविंद्र पाटील, आणि हितेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन युवराज चव्हाण यांनी केले. हा प्रकाशन सोहळा समाजाच्या एकजुटीचे प्रतीक ठरला आणि उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
0 Response to "तळोदा : दोडे गुजर समाजाच्या दिनदर्शिकेचे दिमाखदार प्रकाशन"
टिप्पणी पोस्ट करा