राष्ट्रीय सेवा योजनेत राज्यस्तरीय कामगिरी – हेमांगी मराठे यांचा गौरव
तळोदा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणक शास्त्र प्रशाळेतील हेमांगी भीराम मराठे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलन पूर्व निष्ठा-चाचणी शिबिरात सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
हे शिबिर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या या निस्वार्थ सेवेसाठी विद्यापीठाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात आले.
विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सचिन नांद्रे आणि कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांच्या व क्रिडा मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
हेमांगी मराठे यांची ही यशस्वी वाटचाल राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विद्यापीठाच्या संपूर्ण टीमकडून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
0 Response to "राष्ट्रीय सेवा योजनेत राज्यस्तरीय कामगिरी – हेमांगी मराठे यांचा गौरव"
टिप्पणी पोस्ट करा