अतिदुर्गम भागासाठी आशेचा किरण: अभियंता भूषण भामरे यांचे प्रयत्न उचलणार विकासाचे पाऊल
तळोदा: देशभरातील ग्रामीण भागांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी ग्रामसडक योजनेअंतर्गत धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील गावांना जोडण्यासाठी अभियंता भूषण भामरे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अलवान ते वेरिमाळ ते घोडमाग या 8.50 किमी रस्त्याचा सर्वेक्षण त्यांनी गावकऱ्यांच्या साहाय्याने पूर्ण केले आहे.
रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट असून, पायी चालणेही कठीण होते. अशा परिस्थितीत भूषण भामरे यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने पायी प्रवास करत या रस्त्याचा सर्वेक्षण पूर्ण केले. या रस्त्यामुळे अलवान, वेरिमाळ आणि घोडमाग येथील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
रस्त्याच्या मंजुरीनंतर स्थानिकांना प्रवास सुलभ होईल आणि विकासाला चालना मिळेल. गावकऱ्यांनी अभियंता भामरे यांच्या या समर्पित कार्याचे कौतुक केले आहे आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे गावातील नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
रस्त्याच्या मंजुरीची प्रक्रिया लवकरच मार्गी लागेल, असे भूषण भामरे यांनी सांगितले आहे. त्यांच्या कार्यामुळे ग्रामविकासासाठी मोठे पाऊल टाकले जाईल, अशी आशा गावकरी व्यक्त करत आहेत.
0 Response to "अतिदुर्गम भागासाठी आशेचा किरण: अभियंता भूषण भामरे यांचे प्रयत्न उचलणार विकासाचे पाऊल"
टिप्पणी पोस्ट करा