जिल्हा परिषद सदस्या सुनिता पवार यांची ग्रामपंचायत मोड येथे कामाचा आढावा बैठक
तळोदा :जिल्हा परिषद बोरद गटाच्या सदस्या सुनिता भरत पवार यांनी ग्रामपंचायत मोड येथे विकासकामांचा आढावा घेतला. या बैठकीत ग्रामपंचायतीच्या विविध प्रलंबित योजनांवर चर्चा झाली.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्यांनी रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यासंबंधित समस्या मांडल्या. सुनिता पवार यांनी सर्व समस्या समजून घेत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीला भरत पवार, ग्रामपंचायत इंजिनिअर, तसेच सदस्य गुलाब दादा, प्रवीण भाऊसाहेब, आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी विकासकामांसाठी दिलेल्या सूचना व अपेक्षांचे स्वागत करत पुढील काळात कामांना गती देण्याचे आश्वासन जिल्हा परिषद सदस्यांनी दिले.
ग्रामस्थांनी सुनिता पवार यांच्या या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले आणि स्थानिक समस्यांवर लवकर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली.
0 Response to "जिल्हा परिषद सदस्या सुनिता पवार यांची ग्रामपंचायत मोड येथे कामाचा आढावा बैठक"
टिप्पणी पोस्ट करा