संपर्क करा

मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा; शहादा तळोदा मतदारसंघासाठी भरीव निधीची मागणी

मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा; शहादा तळोदा मतदारसंघासाठी भरीव निधीची मागणी

तळोदा: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्री व मंत्र्यांना शुभेच्छा देत मतदारसंघातील विकासकामांसाठी भरीव निधीची मागणी केली.

          यावेळी आमदार पाडवी यांनी शहादा व तळोदा मतदारसंघातील प्रलंबित प्रकल्प, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित योजनांची सविस्तर माहिती मांडली. त्यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयकुमार रावल यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिला. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, "शहादा तळोदा मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही." तसेच मंत्री जयकुमार रावल यांनी देखील विकासाच्या दृष्टीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या भेटीत मतदारसंघातील मोठ्या प्रकल्पांवर सखोल चर्चा झाली. सिंचन प्रकल्प, ग्रामीण रस्त्यांचे मजबुतीकरण, पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना, तसेच औद्योगिक क्षेत्राच्या विकासाबाबत प्राधान्य दिले जाणार असल्याचे ठरवण्यात आले.

राज्य सरकारच्या वतीने विकासाला गती देण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री व मंत्र्यांनी मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आवश्यक निधी मंजूर करण्याचे संकेत दिले. आमदार पाडवी यांच्या या प्रयत्नांमुळे मतदारसंघातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आगामी काळात मतदारसंघाला विकासाच्या दृष्टीने मोठी मदत मिळण्याची अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे. याप्रसंगी त्यांच्या सोबत आमदार दिलीप बोरसे, आमदार काशीराम पावरा ,आमदार अनुप भैय्या अग्रवाल, आमदार राघवेंद्र पाटील आदिजन उपस्थित होते.


0 Response to "मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा; शहादा तळोदा मतदारसंघासाठी भरीव निधीची मागणी"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article