संपर्क करा

गोरगरीब महिलांना ब्लँकेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन

गोरगरीब महिलांना ब्लँकेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन

तळोदा ; 21 डिसेंबर 2024 रोजी, पतंजली योग नंदुरबार व महात्मा फुले सामाजिक लोक विकास बहुउद्देशीय संस्था तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने, अण्णा भाऊ साठे नगर, कालिका माता मंदिराजवळ, तळोदा येथे गोरगरीब महिलांसाठी कडाक्याच्या थंडीपासून आराम मिळावा या हेतूने ब्लँकेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अध्यक्ष आणि अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अंबालालभाऊ साठे उपस्थित होते. तसेच, जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा भा.ज.पा. आणि जिल्हा उपाध्यक्ष मातंग समाज नंदुरबार निलेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र शिंदे, चिंतामण साठे व संस्थेचे ज्येष्ठ सदस्य, पदाधिकारी, आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

          कार्यक्रमामध्ये गरजू महिलांना ब्लँकेट वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक आगळा-वेगळा आदर्श समोर ठेवण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या परिस्थितीवर भाष्य करत त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

            हा कार्यक्रम परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून, सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून गरजूंना मदतीचा हात देण्याचे कार्य यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले.

0 Response to "गोरगरीब महिलांना ब्लँकेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article