तळोदा शाखेत 1.50 कोटींचा अपहार: तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
तळोदा : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तळोदा शाखेत सुमारे 1.50 कोटी रुपये अपहार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी शाखेतील तत्कालीन तीन कर्मचाऱ्यांवर फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, आणि संगनमताने आर्थिक गैरव्यवहार करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाखेतील कर्मचाऱ्यांनी 89 सभासदांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून खोट्या सह्या घेतल्या आणि त्यांच्या नावावर पीक कर्ज मंजूर करून रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी काढली. या प्रकारामुळे एकूण 1,91,52,090 रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले असून, 1.50 कोटी रुपये अजूनही वसूल करण्यात आलेले नाहीत.
गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पंढरीनाथ पुंडलिक मराठे, इस्माईल खा बुन्हानखॉ पठाण, आणि जयराज चुनीलाल धानका यांचा समावेश आहे. या तिघांनी संगनमताने हा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
0 Response to "तळोदा शाखेत 1.50 कोटींचा अपहार: तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल"
टिप्पणी पोस्ट करा