संपर्क करा

सोरापाडा-खटवानी नाल्यात नवजात अर्भकाला फेकण्याचा प्रयत्न ; पोलीस तपास सुरू

सोरापाडा-खटवानी नाल्यात नवजात अर्भकाला फेकण्याचा प्रयत्न ; पोलीस तपास सुरू

अक्कलकुवा:  १ डिसेंबर २०२४ रोजी सोरापाडा व खटवाणी गावाच्या काठावर असलेल्या नाल्यात एक अज्ञात व्यक्ती एका नवजात पुरुष अर्भकाला उघड्यावर टाकून गेल्याची घटना घडली. या अर्भकाचे वय १ ते २ दिवस असावे, असे सांगण्यात येत आहे.

          अर्भकाची देखभाल करणाऱ्याने त्याला नाल्यात फेकून दिल्याचे आरोप आहेत. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी अर्भकाला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल केले. त्याची स्थिती सध्या स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असून, अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. पोलिसांनी जनतेला या घटनेबद्दल माहिती दिली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी मदत करण्याचे आवाहन केले आहे. नवजात अर्भकाचा परित्याग करणे बाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या गुन्हाचा तपास पोउनि देविदास वडघुळे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी: पोनि गुलाबराव पाटील हे करीत आहेत.

0 Response to "सोरापाडा-खटवानी नाल्यात नवजात अर्भकाला फेकण्याचा प्रयत्न ; पोलीस तपास सुरू "

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article