उसाच्या ट्रॉली खाली दबून वृद्धाचा मृत्यू – ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मयत देवजी एमथा पाडवी (वय ६८, रा. मोदलपाडा) हे अपघातात ट्रॉलीच्या खाली दाबले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालक तौसिब शेख शकिल (रा. प्रकाशा, ता. शहादा) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हलगर्जीपणे वाहन चालवल्याने हा अपघात घडल्याचा आरोप आहे. अपघातात वापरलेले वाहन न्यु हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर (क्रमांक MH-39 N 2632) असून, फिर्यादी कैलास टेङग्या पाडवी (वय ४४, रा. मोदलपाडा) यांनी तक्रार दिली. तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पोहेकॉ गोवर्धन वसावे यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून, संबंधित आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले..
0 Response to "उसाच्या ट्रॉली खाली दबून वृद्धाचा मृत्यू – ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल"
टिप्पणी पोस्ट करा