मुख्याधिकारी नगर परिषद, तळोदा यांना डास नियंत्रणासाठी निवेदन
तळोदा : शहरातील वाढत्या डासांच्या उपद्रवामुळे आरोग्याच्या समस्यांचा सामना करणाऱ्या नागरिकांसाठी डास नियंत्रण उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे यासंदर्भातलेनिवेदन मुख्याधिकारी यांना सादर केले आहे.
नगर परिषदेला दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून शहरात डास प्रतिबंधक फवारणी मोहिम तातडीने राबवावी, गटारीतील साचलेले पाणी आणि कचऱ्याचा निचरा करून स्वच्छता सुनिश्चित करावी, डासजन्य आजारांविषयी जनजागृती मोहिम राबवावी, उपाययोजनांवर नियमित निरीक्षण ठेवून तक्रारींचे तातडीने निवारण करावे यासह बाजारपेठ, शाळा, आणि रुग्णालय परिसरात डासांच्या उपद्रवाचे प्रमाण वाढत असून यामुळे डेंग्यू, मलेरिया, आणि इतर आजारांचा धोका वाढला आहे. नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद आहे.
याबाबत नगर परिषदेने सकारात्मक प्रतिसाद देत डास नियंत्रणासाठी प्रभावी पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. निवेदनावर सचिन भोई, आशिष बारी आदींच्या सह्या आहेत.
0 Response to "मुख्याधिकारी नगर परिषद, तळोदा यांना डास नियंत्रणासाठी निवेदन"
टिप्पणी पोस्ट करा