तळोदा प्रवासी महासंघाने आगार प्रमुखांना निवेदन सादर केले, नवीन बसेसची मागणी
तळोदा : महाराष्ट्र प्रवासी महासंघ शाखा तळोदा तर्फे अक्कलकुवा आगार प्रमुख रवींद्र मोरे यांची भेट घेऊन जुन्या बसगाड्या बदलण्यासाठी आणि नवीन बसेस उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले. शिष्टमंडळाने प्रवासी आणि वाहनचालकांसाठी सुरक्षित प्रवासाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुन्या बसगाड्यांचा प्रश्न: जीर्ण बसगाड्या आणि वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नवीन बसगाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी असून लांब पल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन बस सुरू करणे, रातराणी बस सेवा" सुरू करणे, विद्यार्थ्यांसाठी विशेष बस सेवा सुरू करणे, संध्याकाळी विद्यार्थ्यांना परतीसाठी बस सेवा उपलब्ध करून देणे श्री. प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवपुराण कथा कार्यक्रमासाठी विशेष व्यवस्था करणे, दिनांक 1 ते 8 डिसेंबर 2024 दरम्यान शिरपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी अक्कलकुवा ते शिरपूर सकाळची आणि शिरपूरहून अक्कलकुवा परतीच्या बस सेवा सुरू करणे. नंदुरबारसाठी रात्री 9 वाजेनंतर बससेवा सुरू करणे.
तळोदा प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अॅड. अल्पेश जैन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात ग्राहक पंचायत जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी, प्रा. राजाराम राणे, पंडित भामरे, पंकज तांबोळी, रमेश कुमार भाट, कुशल जैन, विनोद माळी, चेतन धानका व इतर सदस्य यावेळी उपस्थित होते. आगार प्रमुख रवींद्र मोरे यांनी शिष्टमंडळाच्या मागण्या सकारात्मकतेने ऐकून घेतल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. निवेदनाची प्रत विभागीय नियंत्रक, धुळे यांनाही पाठवण्यात आली आहे.
0 Response to "तळोदा प्रवासी महासंघाने आगार प्रमुखांना निवेदन सादर केले, नवीन बसेसची मागणी"
टिप्पणी पोस्ट करा