बिबट कातडी तस्करी प्रकरणात सहा आरोपींना अटक, मोठी वनविभागाची कारवाई . वाचा कुठे अन् कशी झाली कारवाई
तळोदा : शनिवारी गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी येथील रणजित करमसिंग पाडवी यांच्या घरी छापा टाकला. यावेळी बिबट्याची कातडी नग-1 जप्त केली आणि सहा आरोपींना अटक केली. आरोपींना कोर्टात हजर केले असता, त्यांना ५ दिवसांची चौकशीसाठी रिमांड मिळाली. या कार्यवाहीत वाईल्ड लाइफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई आणि वनविभागाच्या पथकाने एकत्रितपणे सापळा रचला. आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि म्होरक्याचा शोध सुरू आहे.
या कारवाईचे मार्गदर्शन वनसंरक्षक निनू सोमराज, उपवनसंरक्षक संतोष सस्ते, लक्ष्मण पाटील, राजेंद्र सदगीर आणि धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
0 Response to "बिबट कातडी तस्करी प्रकरणात सहा आरोपींना अटक, मोठी वनविभागाची कारवाई . वाचा कुठे अन् कशी झाली कारवाई"
टिप्पणी पोस्ट करा