
जिल्ह्यात कोविडशील लसीचा स्टॉक शिल्लक नाहीजिल्ह्यात कोविड शील्ड लसीच्या तुटवडा !
तळोदा : जिल्ह्यात एकही सरकारी रुग्णालयात कोविडशील्ड लसीचा स्टॉक शिल्लक असून कोविड शील्ड लसीच्या तुटवडा निर्माण झाला आहे. बूस्टर डोस घेणाऱ्या नागरिकांना कोविडशील नसल्यामुळे माघारी परतावे लागत आहे. कोविडशील ऐवजी सुद्धा घेता येऊ शकते असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
भारतात बऱ्या प्रमाणात कोरोनाची लाट कोसळल्यानंतर लसीकरणात देखील मोठ्या प्रमाणात शिथिलता आली होती. मात्र चीन मधून येणाऱ्या बातम्यांनी पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बूस्टर डोस न घेतलेले नागरिकांनी स्वतःहून बूस्टर डोस घेण्यासाठी पुढे येत असल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. मात्र जिल्ह्यात कोविड शील्ड लसीच्या स्टॉक शिल्लक नसल्याने बूस्टर डोस घेणाऱ्या नागरिकांना कोविड शील्ड लस अभावी सरकारी रुग्णालयातून परत फिरावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात एकाही रुग्णालयात कोविडशिल्डच्या डोस उपलब्ध नसून केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या गाईडलाईनुसार कोविडशिल्डऐवजी को वॅक्सिन लस सुद्धा बूस्टर डोस म्हणून घेण्याला परवानगी मिळाली असून नागरिकांनी को वॅक्सिन लस बूस्टर डोस म्हणून घेण्यास हरकत नाही,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गोविंद पाटील यांनी 'दै लोकमत'शी बोलताना दिली आहे. अनेक आरोग्य केंद्रावर को वॅक्सिंग लस उपलब्ध असून नागरिकांनी कुठलाही गैरसमज न ठेवता बिनधास्तपणे घ्यावी असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.
समाजात कोरोणा प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात गैरसमज होते. त्यामुळे लसीकरणावर मोठा दुष्परिणाम देखील झाला होता.सुरुवातीला नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नव्हते. लसीकरणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम देखील राबवण्यात आली होती.आता नागरिक लस घेण्यासाठी स्वतःहून पुढे येत असताना कोविडशिल्ड लसीचा डोस उपलब्ध नसल्याने नागरिक कोविडशिल्ड ऐवजी दुसरी लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याच्या अनुभव आहे.पहिला व दुसरा डोस कोविड शिल्डचा घेतलेले नागरिक बूस्टर डोस कोविड शिल्ड लस घेण्याबाबत आग्रही असल्याचे दिसून येत आहेत. कोविडशिल्ड लसच्या ऐवजी को वॅक्सिंग लस घेण्यापेक्षा लस न घेतलेली बरी अशी नागरिकांनी भूमिका घेतली असून यामुळे बूस्टर डोस लसीकरण मोहिमेला खोडा निर्माण झाला आहे.
संभाव्य कोरोना साथीच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर नागरिक स्वतःहून लसीकरणासाठी पुढे येत असताना आरोग्य विभागाने शासनाच्या गाईडलाईन पुढे करून दुसरी लस घेण्याच्या आग्रह करण्याऐवजी कोविडशिल्ड लस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शासनाच्या गाईडलाईन संदर्भात मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची देखील गरज निर्माण झाली असून आरोग्य विभागाने त्या दृष्टीने देखील कृती कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे.
कोट : जिल्ह्यात कोविडशील्ड लसीचा डोस उपलब्ध नाही.मात्र,शासनाच्या गाईडलाईनुसार कोविडशील्ड ऐवजी कोवॅक्सिन लस सुद्धा घेता येते.आरोग्य विभागाच्या सर्व यंत्रणेला ते माहीत असून त्या संदर्भात सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता बूस्टर डोस म्हणून कोवॅक्सिन लस लस घ्यावी.
डॉ गोविंद चौधरी,
जिल्हा आरोग्य अधिकारी,नंदूरबार
0 Response to "जिल्ह्यात कोविडशील लसीचा स्टॉक शिल्लक नाहीजिल्ह्यात कोविड शील्ड लसीच्या तुटवडा !"
टिप्पणी पोस्ट करा