संपर्क करा

तळोदा येथे गुटका विक्रेत्यांवर कारवाई२५ हजारांचा गुटका पकडला

तळोदा येथे गुटका विक्रेत्यांवर कारवाई२५ हजारांचा गुटका पकडला

तळोदा : शहरात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे २५ हजारांचा गुटखा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तळोदा दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,तळोदा तालुक्यातील आमलाड येथील निखिल कुमार रामराव आघाडी यांच्याकडे गुटखा असल्याची माहिती गुप्त सूत्रांकडून मिळाली होती या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी तळोदा पोलीस स्टेशनच्या पथकाला सोबत घेऊन त्यांच्या घराची झेडपी घेतली असता त्या ठिकाणी 21094 रुपयाच्या गुटखा आढळून आला.
       त्याचप्रमाणे तळोदा शहरातील बद्री कॉलनी मधील अमरराम बालाराम चौधरी यांच्या राजेश्वरी प्रोव्हिजन येथे देखील दुकानाची झडती घेतली असता दुकानांमध्ये 3560 रुपयांचा गुटखा आढळून आला.
        या दोन्ही ठिकाणीं केलेल्या करवाई प्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निखिलकुमार रामराव आघाडे व अमरराम बलराम चौधरी यांच्या विरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0 Response to "तळोदा येथे गुटका विक्रेत्यांवर कारवाई२५ हजारांचा गुटका पकडला"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article