संपर्क करा

पत्रकारितेचा केंद्रबिंदू सामान्य माणूसच : जेष्ठ पत्रकार रमाकांत पाटील               तळोदा येथे जेष्ठ पत्रकारांच्या सत्कार समारंभ

पत्रकारितेचा केंद्रबिंदू सामान्य माणूसच : जेष्ठ पत्रकार रमाकांत पाटील  तळोदा येथे जेष्ठ पत्रकारांच्या सत्कार समारंभ


तळोदा: पत्रकारिता क्षेत्रात मोठी क्रांती झालेली आहे.पत्रकारिता क्षेत्रातील व्यवस्था व तंत्र बदलले तरी पत्रकारितेच्या केंद्रबिंदू हा नेहमी शोषित, पिडीत,दुर्लक्षित सामान्य माणूसच राहिलेला आहे आणि यापुढेही राहील असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील यांनी कळवण्यात आयोजित जेष्ठ पत्रकारांच्या समारंभ प्रसंगी केले..
          तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान सोहळा शहरातील आदिवासी सांस्कृतिक भवनात आयोजित केला होता. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना श्री.पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी होते..
            प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला माजी मंत्री व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पद्माकर वळवी माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी, मोती उद्योग समूहाचे चेअरमन निखिल तूरखिया, ज्येष्ठ पत्रकार अमरजीत बारगळ आदी उपस्थित होते.
         श्री.पाटील पुढे म्हणाले की, पत्रकार क्षेत्रात नवीन आव्हाने निर्माण होत आहेत. पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत पण त्यातील सर्वात मोठे समस्या असून तालुका पत्रकारांना अधिस्वीकृती पत्र मिळायला पाहिजे.ही जुनी मागणी असून वारंवार त्याच्या पाठपुरावा करण्यात आलेला आहे. जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांची मोलाची भूमिका असून जिल्ह्याला लागलेला मागासने कोणाचे कलंका पुसण्यासाठी पत्रकारांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे देखील ते म्हणाले.
          याप्रसंगी बोलताना माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी सांगितले की, पत्रकार नेहमीच लोक्रतिनिधींनी, शासन, प्रशासनाला दिशा देण्याचे काम करत असतात, मात्र ते नेहमीच दुर्लक्षित राहत असल्याची देखिल खंत व्यक्त केली. माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी पत्रकारितेतील माध्यम समूह सध्या भांडवलदारांच्या हातात असून पत्रकारांचे मोठ्या प्रमाणात दमण होत आहे. पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असुरक्षितता वाढली असून पत्रकारांच्या न्याय हक्क अबाधित राखण्यासाठी शासनाने धोरण ठरविण्याची  गरज असल्याचे सांगितले. सामान्य नागरिक व लोकप्रतिनिधींनी देखिल बातम्या गांभीर्याने घेवून पत्रकाराने दिलेली बातमी ही खिलाडूवृत्तीने स्वीकारून पत्रकाराला दमदाटी न करता लोकप्रतिनिधी,नेते यांनी बातमी सकारात्मक घेवून आपल्यात सुधारणा घडवून आणायला पाहिजे,असे देखील ते म्हणाले. यांनी तालुका मराठी पत्रकार संघ कौतुक करत संघांच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
          कार्यक्रमाला नगरसेवक सुभाष चौधरी, गौरव वाणी, हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी योगेश मराठे,बापू कलाल,संजय पटेल आनंद सोनार निलेशचंद्र सूर्यवंशी, डी ओ भोई, जगदीश वानखेडे, गणेश शिवदे, ऍड.अल्पेश जैन,कॉ. दयानंद चव्हाण, गोकुळ पवार, यांच्यासह तळोदा शहरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल सूर्यवंशी व हंसराज महाले यांनी केले. प्रास्ताविक सुधाकर मराठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तळोदा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ईश्वर मराठे, उपाध्यक्ष दिपक मराठे, कोषाध्यक्ष सुशील सूर्यवंशी,जेष्ठ सदस्य भरत भामरे,सुधाकर मराठे,सम्राट महाजन, किरण पाटील,नरेश चौधरी, नारायण जाधव, महेंद्र लोहार, महेंद्र सूर्यवंशी,  मानसिंग राजपूत, दीपक गोसावी, यांनी परिश्रम घेतले.

चौकट
६ जानेवारी मराठी पत्रकारिता दिवसाच्या निमित्ताने तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील निवडक ज्येष्ठ पत्रकारांच्या सत्कार समारंभ दरवर्षी आयोजित करण्यात येतो.यावर्षी सत्कारमुर्ती जेष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, राकेश कलाल, डॉ सतिष चौधरी,राजू गायकवाड, विष्णू जोंधळे,संग्रामसिंग राजपूत,चंद्रकांत चव्हाण,विकासदीप राणे,सुनील मगरे यांची निवड करण्यात आली होती.आमदार राजेश पाडवी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकरांची प्रतिमा व स्नेहवस्त्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

फोटो : तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार सन्मान सोहळ्यात उपस्थित सत्कारमूर्ती रमाकांत पाटील,राकेश कलाल,डॉ सतिष चौधरी,राजू गायकवाड, विष्णू जोंधळे,संग्रामसिंग राजपूत,चंद्रकांत चव्हाण,विकासदीप राणे,सुनील मगरे,सोबत माजी आमदार ऍड. पद्माकर वळवी,उदेसिंग पाडवी,निखिल तुरखिया, अमरजित बारगळ व तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य....

0 Response to "पत्रकारितेचा केंद्रबिंदू सामान्य माणूसच : जेष्ठ पत्रकार रमाकांत पाटील  तळोदा येथे जेष्ठ पत्रकारांच्या सत्कार समारंभ"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article