संपर्क करा

करडे येथे एकास गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह पकडले

करडे येथे एकास गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह पकडले

तळोदा : पोलिसांनी तळोदा तालुक्यातील करडे येथून गावठी कट्टा पकडला असून आरोपी अक्षय निजाम पाडवी याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई तळोदा पोलीस ठाण्यातील पथकाने केली आहे.

              करडे गावात हनुमान मंदीराजवळ सार्व जागी एक इसम बेकायदेशिर विक्री करणेकामी गावठी बनावटीचे रिव्हॉल्वर व जिवंत राऊंड कब्जात बाळगुन असल्याची खबर पो.नी.पंडितराव सोनवणे यांना मिळाली होती. पथकाने करडे गावात जावुन बातमीची खात्री केली. दरम्यान त्यांना एक इसम संशयितरित्या दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेवून नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव अक्षय निजाम पाडवी वय ३२ वर्षे रा.करडे ता. तळोदा जि.नंदुरबार असे सांगितले. त्याच्याकडून २५,००० रु. किंमतीचे एक लोखंडी रिव्हॉल्वर गावटी बनावटीच रिव्हॉल्वर, लोखंडी नळीचे काडतुस भरण्यासाठी गोलाकार फिरणारे बोअर सहा राऊंड बसणारे लोड करण्यासाठी खटका असणारे ट्रीगरसह जुने वापरते मुठपासुन ६ इंच लांबीचा व २. इंच प्लॉस्टीकची मुठ असलेली जु.वा.कि.अं. ६००.०० रु. इसम अक्षय निजाम पाडवी यांचे पॅन्टचे उजव्या खिशांत ६ पितळी व शिसेयुक्त जिवंत काडतुस जु.वा.कि.अं. एकुण २८,६००.०० रुपये रोख लोखंडी गावटी रिव्हॉल्वर व जिवंत काडतुस ताब्यात घेतली. आरोपीने कट्टा विकण्यासाठी आणला होता, असे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.

           याबाबत पोहेकॉ तुकाराम फोपा पावरा यांच्या फिर्यादीवरून संशयित अक्षय निजाम पाडवी याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३ चे उल्लंघन केल्याप्रकरणी तळोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         

    पो.नि.पंडीतराव सोनवणे यांच्या मार्गदर्शाखाली स.पो.नी अमितकुमार बागुल, असई संगिता नथ्थु बाविस्कर, विजय विसावे, पोना राजु बकाराम जगताप,  अजय सिध्दार्थ पवार,  चंद्रसिंग सुरपा वसावे, गौतम बोराळे यांनी ही कारवाई केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.

0 Response to "करडे येथे एकास गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह पकडले"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article