संपर्क करा

जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयांच्या विरोधातील याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली

जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयांच्या विरोधातील याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती : हरकती मान्य केल्याच्या विरोधात दाखल केली होती याचिका

तळोदा :  कृषी उत्पन्न बाजार समिती तळोदाच्या मतदार यादी संदर्भात जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. यामुळे निवडणुकीच्या मार्ग मोकळा झाला असून लवकरच निवडणूक लागण्याची शक्यता आहे.
                तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी १ डिसेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.व्यापारी मतदार संघ यादीतील सागर प्रकाश मराठे यांनी या यादीतील कल्याणी विशाल कर्णकार व इतर १५ तसेच कन्हैयालाल रतिलाल पटेल यांनी श्रीमती किरणदेवी चंपालाल जैन व इतर १४ अशा दोन हरकतदारांनी ३१ जणांच्या सभासदत्वावर प्रश्न उपस्थित करत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कडे लेखी हरकत दाखल करण्यात आल्या होत्या.
            सदस्यांना सन २०२१-२०२२ ची अनूज्ञाप्ती देण्यात आली होती.२०२२-२०२३ अनूज्ञाप्ती नूतनीकरण वेळेत केलेले नाही, फार्म वर नोंदणी क्रमांक व तारीख नाही, फार्म अपूर्ण भरलेला आहे,काहींचा नावांत व आधार कार्डवरील नावांत तफावत आहे,काही कूकरमूंडा गूजरात राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती असताना तळोदाचे सभासद आहेत, आदी मूद्दे हरकतीत उपस्थित करण्यात आले होते. या हरकतींच्या बाजूने निकाल देत 31 सभासदांची नावे वगळण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक भारती ठाकूर यांनी दिले होते.
        या निर्णयाच्या विरोधात किरणदेवी चंपालाल जैन आणि इतर यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका केली होती. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याबाबतची 
याचिका कायम ठेवण्यायोग्य नाहीत म्हणत फेटाळली आहे.
          उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या मार्ग मोकळा झाला असल्याचे मानले जात असून अप्रत्यक्षपणे निवडणुकीच्या बिगुल वाजला असल्याचे समजले जात आहे.

0 Response to "जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयांच्या विरोधातील याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article