
तळोदा शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री
तळोदा : आगामी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने शहरात व तालुक्यात पतंगोतस्वासाठी वापरात येणाऱ्या नायलॉन मांजा छुप्या पद्धतीने व्यापारी विक्री करत असताना पाहायला मिळत आहेत.लहान मुलांकडून व युवकांकडून सर्रासपणे नायलॉन मांजाची खरेदी होत आहे. याकडे प्रशासनाने पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
नायलॉन मांजामुळे पक्षांना मोठ्या प्रमाणात धोका असतो. पक्षांसोबतच अनेक नायलॉन मांजा हाताळणारे बालक व दुचाकीस्वार जखमी होण्याच्या घटना दिसून येतात.
शेजारील गुजरात राज्यात मकर संक्रांति निमित्त पतंगोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. त्याच प्रमाणे तळोदे शहर व तालुक्यात ही पतंगोत्सव मोठी क्रेज दिसून येते. पतंगोत्सव साजरा करताना मजबूत व टिकाऊ धागा वापरण्याकडे पतांगप्रेमीचा कल असतो. या पार्श्वभूमीवर विक्रेते नायलॉन मांजाची मोठ्या प्रमाणात विक्री करतात.नायलॉन मांजाची विक्री व व्यापाराला बंदी असताना छुप्या पद्धतीने विक्री केली
जाते.अनेक जण जवळच असलेल्या शेजारील गुजरात राज्यातून हा जीवघेणा मांजा आणून छुप्या पद्धतीने विक्री करित आहेत.
नायलॉन मांजामुळे पशु, पक्षी, व मोटर सायकलस्वार माणसांना दुखापत होऊन जीव गमावा लागला आहे. त्यामुळे नायलॉन मांजावर कायद्याने विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. नायलॉन माझा विक्रीला पायबंद घालावा व अशा नायलॉन मांजा छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कार्यवाही करून नायलॉन मांजा जप्त करण्यात यावा अशी मागणी पक्षीप्रेमी व सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0 Response to "तळोदा शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री"
टिप्पणी पोस्ट करा