
ते तांदुळ हा प्लास्टिकचे नसून पोषक फोर्टीफाईड तांदूळ : तहसीलदार गिरीष वखारे
तळोदा : तालुक्यात वितरीत केला जाणार तांदुळ हा प्लास्टिकचा तांदुळ नसून तो पोषक फोर्टीफाईड तांदूळ आहे. ज्यात पोष्टिक प्रथिने असून कुपोषित बालकांसाठी लाभदायक तांदूळ असल्याची माहिती तळोदा तहसीलदार गिरीष वखारे यांनी दिली आहे.
तळोदा कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून रास्त भाव धान्य दुकानदारांना वितरीत केले जाते. त्या अनुषगाने रास्त भाव दुकानदारांना तांदळाचे वाटप करण्यात येत आहे. तळोदा शहरासह तालुक्यातील दुकानदारांनी हे तांदूळ कार्डधारकांना वाटप केले आहे. वाटपानंतर तांदूळ प्लास्टिकचे असणे बाबत तक्रारीत वाढ झाली आहे. त्यापैकी लाभार्थ्यांनी हे तादूळ दळण्यासाठी पिठाच्या गिरणीत नेले असता या तांदळात दोन प्रकारचे तांदूळ असल्याचे दिसून आले. हा तांदुळ प्लास्टिकचा असल्याचे प्राथमिक अंदाज करून या तांदळा पासून कोणतीही बाधा होऊ नये म्हणून व लाभार्थ्यांचा संशय दुर व्हावा या द्रुष्टीने सुजाण नागरिकांनी तहसीलदार गिरीष वखारे यांच्या निदर्शनास आणून दिले.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना नुसार योजने अंतर्गत अनुज्ञेय तांदुळ प्रथमच दिला जात आहे. वितरीत करण्यात येत असलेल्या नियमित एक किलो तांदळामध्ये ठरवलेल्या प्रमाण फोर्टीफाईड तांदळाचे आहे. हा तांदूळ नियमित तांदळापेक्षा थोडा पिवळसर आहे. त्यामुळे जनतेच्या मनात या बद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. यामध्ये फाँलीक अँसिड, व्हिटॅमिन ए.बी १, बी २, बी ५, बी ६, बी१२, झिंक या षोषक घटकांचा समावेश करून फोर्टीफाईड तांदूळ बनविण्यात आला आहे. त्यामुळे बालकांना अधिकची पोषकतत्वे मिळण्याच्या द्रुष्टीने हा तांदूळ उपयुक्त आहे. या तांदुळाचे वजन नियमित तांदळापेक्षा कमी असल्याने हे तांदूळ पाण्यावर तरंगताना दिसुन येत आहे. पोषण आहार योजने अंतर्गत पुरवठा करण्यात येत असलेला फोर्टीफाईड तांदूळ हा अधिक पोषकमुल्य असलेला गुणात्मक तांदुळ आहे. अशी माहिती तहसीलदार गिरीष वखारे यांनी दिली. स्वस्त धान्य दुकानात मिळणारे तांदूळ प्लास्टिकचे असल्याबाबत एकच अफेवेचे पेग फुटले होते. परिणामी यावावर तहसीलदार यांनी खुलासा केल्यामुळे प्लास्टिक तांदुळ ही अफवा ठरली आहे...
चौकट :-
याच पद्दतीने शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शाळेत वाटप करण्यात येत असलेल्या तांदळात प्लास्टिकचा तांदुळ असल्याच्या अनेक तक्रारी शालेय पोषण आहार योजनेच्या स्वतंत्र कक्षाला प्राप्त झाल्या होत्या . पोषण आहार योजने अंतर्गत वितरीत करण्यात येत असलेला तांदूळ प्लास्टिकचा नसुन फोर्टीफाईड असल्याचा स्पष्टीकरण शिक्षण विभागाकडून देखील देण्यात आले होते...
प्रतिक्रिया :
रेशन वाटपात प्राप्त झालेल्या तांदूळ प्लास्टिकचे असल्याची चर्चा निरर्थक आहे. ते प्लास्टिकचे तांदूळ नसून फॉर्टीफाईड तांदूळ आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी पोषक तत्वे असलेले फॉर्टीफाईड तांदुळाच्या समावेश त्यात करण्यात आला आहे. यामध्ये फाँलीक अँसिड, व्हिटॅमिन ए.बी १, बी २, बी ५, बी ६, बी१२, झिंक या षोषक घटकांचा समावेश करून फोर्टीफाईड तांदूळ बनविण्यात आला आहे. त्यामुळे बालकांना अधिकची पोषकतत्वे मिळण्याच्या द्रुष्टीने हा तांदूळ उपयुक्त आहे. पोषण आहार योजने अंतर्गत पुरवठा करण्यात येत असलेला फोर्टीफाईड तांदूळ हा अधिक पोषकमुल्य असलेला गुणात्मक तांदुळ आहे.. नागरिकांनी अफवेवर विश्वास ठेवू नये...
गिरीष वखारे
तहसीलदार
0 Response to "ते तांदुळ हा प्लास्टिकचे नसून पोषक फोर्टीफाईड तांदूळ : तहसीलदार गिरीष वखारे"
टिप्पणी पोस्ट करा