
मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू
तळोदा : इलेकट्रीक शॉक लागल्यामुळे २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुकन्या जंगल्या पावरा त्याचा मुलगा नामे राकेश सुकन्या पावरा वय 22 वर्ष रा. रोझवा पुनर्वसन क्र 04 ता. तळोदा हा त्याचे तिन मित्र भिमसिंग उनाज्या पावरा ,दुधल्या दुसायड्या पावरा, विश्राम दुसायड्या पावरा सर्व रा रोझवा पुनर्वसन क्र ४ ता तळोदा असे गढीकोठडा गावाजवळील नाल्यामध्ये मासे पकडायला गेलो असता तेथे विद्युत तारेवर आकडा टाकुन वायर मासे पकडण्यासाठी पाण्यात सोडली होती तेव्हा राकेश सुकन्या पावरा हा पाण्यात पडल्याने त्यास विद्युत शॉक लागला तेव्हा त्यास त्यांच्या सोबत असलेले मित्र त्यास नाल्यातुन बाहेर काढुन त्यास लागलीच मोटारसायकलवर बसवुन त्यास औषधोपचारासाठी उप जिल्हा रुगण्यालय तळोदा येथे दाखल केले असता त्यास डॉ. गणेश पवार यांनी तपासुन मयत घोषीत केले. पुढील तपास चौकशी मा. पोनी/सोनवणे सो, यांच्या आदेशाने पोहेकॉ / 33 राजधर जगदाळे यांना दिला. तळोदा पोस्टे अ.मृरजी नंबर 51/2022 सी. आर. पी.सी. 174 प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
0 Response to "मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू"
टिप्पणी पोस्ट करा