
मोकाट गुरे, वराह व कुत्र्यांच्या झुंडीने नागरिक त्रस्तउपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
तळोदा - शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांची, मोकाट गुरे, वराह, यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने यांच्या बंदोबस्त करावी अशी मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.
शहरातील विविध रहिवासी भागांत, बस स्टँड,धान्य मार्केट परिसरात, चिनोदारोड परिसर,मेन रोड इत्यादी भागत मोकाट गुरे, कुत्रे, व वराह हे झुंडीने फिरताना दिसून येत आहेत या झुंडीमुळे वाहन चालकांचे लहान मोठे अपघात सातत्याने घडून येत असून अनेकांना यामुळे जायबंदी व्हावे लागत असल्याचा अनुभव आहे.
रहिवासी भागांमध्ये कुत्र्यांची व वराहांची संख्या मोठया प्रमाणात वाढली असून लहान मुलांना चावा घेण्याचे प्रकार देखील घडले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे नागरिकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती देखील निर्माण झाली आहे.नागरिकांकडून वेळोवेळी सदर समस्या बाबतीत सांगण्यात येऊन सुध्दा त्याची दखल संबंधित विभागाकडून घेतली जात नाही व कारवाई होत नाही. त्यामुळे मोकाट जनावरे, वराह व कुत्र्यांपासून शारीरिक हानी पोहचविण्याचा व लहान मोठे वाहनांचे अपघात होण्याचा घटनेत वाढ झाली आहे.
सकाळी शहरातील व नवीन वसाहतीतील
मंदीरावर नियमित पाणी चढविणे व पूजाअर्चा करण्यासाठी स्रिया त्याचबरोबर पुरुष, मुले ही मंदिरात जात असतात. स्रियांना मंदिरात पायीच जावे लागते. काही स्रिया पहाटेच निघतात त्यावेळेस अशा भक्तांना ह्या कुत्र्यांपासून व मोकाट गुरे, वराह यांच्या पासून त्रास होत आहे.
अनेकदा अचानक पळत आलेल्या झुंडी मुळे मोटरसायकलवर, रिक्षा, चारचाकी वाहने यांच्या लहान मोठे अपघात झालेले आहेत व अशा मोकाट कुत्रे, जनावरे, वराह यांच्या त्रास वाहनचालक, नागरिक, महिला, शाळकरी लहान मुले यांना सहन करावा लागत आहे.
यामुळे शहरात प्राणहानी किंवा मोठा अपघात होण्याची वाट न पहाता संबंधित विभागाकडून कारवाई होणे गरजेचे झाले आहे. तसेच तळोदा शहरात पुर्वी प्रमाणे नगर परिषदेच्या कोंडवाडा होणेही गरजेचे झाले आहे. मोकाट फिरणाऱ्या गुरे, वराह, व कुत्रांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा व नवीन कोंडवाडा तयार करावा अशी मागणी शहरातील सर्व स्तरातून नागरिकांनी केली आहे.
0 Response to "मोकाट गुरे, वराह व कुत्र्यांच्या झुंडीने नागरिक त्रस्तउपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी"
टिप्पणी पोस्ट करा