
जनमानसात प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून आश्रमशाळेत पत्रकारांना प्रवेश बंदी
तळोदा प्रकल्पाच्या तुघलकी निर्णय
तळोदा:आदिवासी विकास विभागाची प्रतिमा मरण होऊ नये म्हणून शाळेत पूर्वपरवानगीशिवाय कुठल्याही वृत्तपत्र प्रतिनिधी वार्ताहर यांना शाळेत प्रवेश करण्याचा तुघलकी निर्णय तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांनी काढला आहे. यामुळे आश्रमशाळांमधील अनागोंदी कारभार वाढणार असून त्याला प्रकल्प अधिकाऱ्यांनी आश्रमशाळेचे कोंबडे कितीही झाकून ठेवण्याच्या प्रयत्न केला तरी आश्रमशाळांचा भोंगळ कारभार पत्रकार चव्हाट्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पत्रकार संघटनेने दिला आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासी शिक्षण मिळावे यासाठी आदिवासी विकास विभागाकडून शासकीय व अनुदानित आश्रम शाळा चालविण्यात येतात. आदिवासी विकास विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या या आश्रम शाळा नेहमीच वादाच्या भौऱ्यात सापडलेल्या आहेत आश्रमशाळांमध्ये असणाऱ्या भ्रष्टाचार,विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सोयी सुविधा या बाबी काही नवीन नाही गेल्या अनेक प्रकार असून या बाबी उघड झालेले आहेत याशिवाय आश्रम शाळांमध्ये असणारे मुख्याध्यापक व शिक्षकांची असणारी अपुरी संख्या यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य नेहमीच टांगणीला असते.
शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहीतर अनेकदा आश्रमशाळेत चांगले दर्जेदार जेवण देखील मिळत नाही.याच्या निषेधार्थ म्हणून अनेक वेळा विद्यार्थी आंदोलनाची भूमिका घेत असतात.अनेकदा विद्यार्थ्यांनी आपल्या पेट्या घेऊन प्रकल्प कार्यालयावर देखील धडकले आहेत.आपल्या समस्यांबाबत विद्यार्थी व पालक वृत्तपत्र प्रतिनिधीशी संपर्क करून त्यांच्या समस्या मांडत असतात. विद्यार्थी व पालकांच्या तक्रारीनुसार वार्ताहर घटनास्थळी वस्तुनिष्ठ वृत्तांकन करत असतात.या सर्वांतून विद्यार्थ्यांच्या प्रश्न व समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देणे, हीच भूमिका असते.मात्र,विद्यार्थ्यांनी गैरसोयी व समस्यांबाबत कोणतीही प्रकारची वाच्यता होऊ नये व विद्यार्थ्यानी त्यांच्यावर मुकाट्याने होणारा अन्याय सहन करावा,यासाठी प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांनी मुस्कटदाबी करत असल्याचे सांगितले जात आहे.
हा आदेश निर्गमित करताना प्रकल्प अधिकारी मंदार पक्की यांनी तब्बल आठ वर्षे पूर्वीच्या आदिवासी विकास नाशिक यांचे पत्र क्र. संघटना 19 डिसेंबर 2015 चा संदर्भ पत्राच्या संदर्भ दिलेला आहे.
तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील येणाऱ्या शासकिय, अनुदानित आश्रमशाळा,एकलव्य,शासकीय वस्तीगृह येथील आवारात तसेच शाळेतील वर्गखोली, स्वयंपाक गृह,वस्तीगृह,स्वच्छता गृह, इत्यादी ठिकाणी दूरचित्रवाहिनीचे व पत्रकार अनधिकृतरित्या प्रवेश करून चित्रीकरण करतात, फोटो काढतात व व्हिडिओ वापरून न्यूज क्लिप तयार करून प्रसारित करतात. त्यामुळे परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कित्येक वर्षे कार्यरत असणाऱ्या आश्रमशाळा, वसतीगृह,शालेय प्रशासन यांना नाहक त्रास होतो तसेच आदिवासी विकास विभागाची जनमानसात प्रतिमा मलिन होते.अश्या प्रकारच्या घटना टाळण्यासाठी शासकीय, अनुदानित,एकलव्य, शासकीय वस्तीगृह येथे दिवसा व रात्री कुणी ही पत्रकार, वार्ताहर विनापरवाणगीने प्रवेश देऊ नये, विद्यार्थी, विद्यार्थीनींशी संपर्क साधू देऊ नये वरिष्ठ कार्यालयाच्या लेखी परवाणगीशिवाय कोणत्याही दुरचित्रवाहीणीच्या प्रतिनीधीस अथवा वृत्त पत्राच्या वार्ताहर, पत्रकार यांना तसेच इतर कोकणत्याही व्यक्तीला शाळेच्या आवारात चित्रीकरण अथवा विद्यार्थीींशी बोलण्यास परवानगी देऊ नये तसेच शाळेच्या आवारात प्रवेश देऊ नये.अशा प्रकारची सुचना देणारे फलक नोटीस बोर्डवर शाळेच्या प्रवेश व्दारावर लावण्यात यावे. सुचनेचे सर्वांनी गांभीयाने पालन करावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावे,असे देखील या तघलकी आदेशात म्हटले आहे.
या आदेशानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांना नेमकी पत्रकारांची एवढी धास्ती का?असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आश्रम शाळा वस्तीगृहाच्या आवारात पत्रकारांना प्रवेशास मज्जाव करण्याऐवजी आश्रमशाळा, वसतीगृह यांच्या सुधारणा व विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांकडे लक्ष दिल्यास पत्रकारांना बंदी ही वेळ येणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया पत्रकारिता क्षेत्रातून व्यक्त केल्या जात आहेत.
0 Response to "जनमानसात प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून आश्रमशाळेत पत्रकारांना प्रवेश बंदी "
टिप्पणी पोस्ट करा