
तळोदा तालुक्यातील २५ तलाठी कार्यालयांसाठी ७ कोटी ८५ लाखाचा निधी मंजूर
तळोदा : तालुक्यातील गावांमध्ये तलाठी कार्यालयाला कामकाजासाठी पुरेशी जागा नसल्याने त्याचा परिणाम शासकीय कामकाजावर होत होता. त्यामुळे तलाठी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना तसेच ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तलाठी कार्यालये व्हावेत यासाठी आमदार राजेश पाडवी यांचे प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यश आले असून तालुक्यातील २५ गावांत तलाठी कार्यालय व ४ मंडळ कार्यालयाच्या बांधकामासाठी ७ कोटी ८५ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.
शेतकऱ्यांच्या सातबारा पासून ते जमिनीच्या ८ अ, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न, शेतीचा फेरफार अशा इतर अनेक कागदपत्रासाठी तलाठी कार्यालयात सामान्य माणसाला जावे लागते शेतकऱ्यांना, नागरिकांना या कार्यालयातून उत्तम प्रकारची सेवा मिळावी यासाठी गावातील तलाठी कार्यालय सुसज्ज व आधुनिक असावे असा शासनाचा मानस आहे. याचाच भाग म्हणून तळोदा येथील २५ तलाठी कार्यालये व ५ मंडळ अधिकारी कार्यालयासाठी शासनाने ७ कोटी ८५ लाखाचा निधी मंजूर केला आहे.
ग्रामीण प्रशासनाचा कणा असणारे सामान्य नागरिकांच्या अत्यंत जवळचे व गरजेचे हे तलाठी कार्यालय सुसज्ज असावे आधुनिक सोयींनी युक्त, प्रशस्त असणे आवश्यक असते तळोदा तालुक्यात विविध विकास कामे सुरू आहेत यात रस्ते, पूल, प्राथमिक आरोग्य केंद्र, यासह शासकीय इमारतींचे बांधकामांसोबतच ग्रामीण प्रशासन गतिमान करण्यासाठी व ग्रामीण नागरिकांना उत्तम सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अशा सुसज्ज इमारतीची आवश्यकता आहे. तळोदा तालुक्यात या सुसज्ज इमारती उभारण्यात याव्यात यासाठी शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा करण्यात आला यामुळेच इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता दिली आहे...
ग्रामीण भागात तलाठी शासन व नागरिक, शेतकरी यांच्यामधील महत्त्वाची भूमिका निभावत असतो. जमिनी संबंधित अभिलेखन सतत अद्यावत राहावीत तसेच वेगवेगळ्या नोंदीसाठी नागरिकांना नेहमीच तलाठी कार्यालयाची आवश्यकता भासते. गावात तलाठी कार्यालय झाल्याने सामान्य नागरिकांचे कामकाज सोयीस्कर होण्यास नक्कीच मदत होईल. गेले अनेक वर्षापासून या गावात तलाठी कार्यालय इमारत नसल्याने गैरसोय होत होती. मागील वर्षापासून या कार्यालयाचे इमारत बांधकाम होण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांचा पाठपुरावा सुरु होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
चौकट :
तळोदा तालुक्यातील २५ तलाठी कार्यालये मंजूर झाले आहेत. त्यात छोटाधनपूर, मोहिदा, राणीपूर, भंवर, कोठार, दलेलपुर, चिनोदा, राजवीहीर, खुशगव्हाण, शिर्वे, मोड, कढेल, तळवे, मोरवड, अमोनि, इच्छागव्हाण, धानोरा, खरवळ, मालदा, करडे, पाडळपूर, नळगव्हाण, मोदलपाडा, अमलपाडा, या गावांच्या समावेश आहे. तर तालुक्यातील तळोदा, बोरद, प्रतापपूर, व सोमावल या ठिकाणी चार मंडळ कार्यालय मंजूर आहेत. या कामांसाठी ६ कोटी २५ लाख तर ४ मंडळ कार्यालयासाठी १ कोटी ६० लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.
प्रतिक्रिया :
तलाठ्यांना गावात व तहसील कार्यालयात बसण्यास जागा नसल्याने अनेक दाखल्या पासून नागरिक वंचित होऊन कामे खोळबत होती. समस्या घेवून येणाऱ्या नागरिकांना तलाठ्यांचा शोध घ्यावा लागत होता.यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी महसूल मंत्री ना.विखे पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून तालुक्यासाठी २५ तलाठी कार्यालय व चार मंडळ कार्यालयासाठी ८ कोटी निधी मंजूर केला आहे.
राजेश पाडवी
आमदार
शहादा तळोदा विधानसभा मतदार संघ
0 Response to "तळोदा तालुक्यातील २५ तलाठी कार्यालयांसाठी ७ कोटी ८५ लाखाचा निधी मंजूर"
टिप्पणी पोस्ट करा