
असा नगराध्यक्ष होणे नाही पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून नगराध्यक्षांसाठी निरोप समारंभ
तळोदा : नगरपालिकेचे नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या कार्यकाळ संपल्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
नगराध्यक्ष पदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर अजय परदेशी यांनी माझ्या कार्यकाळात सफाई कामगारांचे कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण होणार नाही अशा पद्धतीचे आश्वासन दिले होते. मागील पाच वर्षात त्या शब्दाची जाण ठेवून कोणत्याही प्रकारे सफाई कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला नसल्याचे मत सफाई कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांच्या मयत कुटुंबाच्या आर्थिक कणा मजबूत असावा म्हणून वारसांना वारसा पद्धतीच्या नोकऱ्या एका महिन्याच्या आत दिल्या, त्यासोबत सेवानिवृत्त झालेला कर्मचाऱ्यांच्या रकमा तसेच पीएफ रक्कम, प्रदान रक्कम रजा रोखीकरण रक्कम सातवा वेतन आयोग इत्यादी रकमा देताना कुठल्याही प्रकारची आर्थिक मागणी केली नसल्याचे राजेंद्र चव्हाण यांनी बोलताना सांगितले. स्वच्छतेच्या ठेका पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या पगार देखील उशिरा होऊ नये यासाठी बऱ्याचदा स्वतः पैशांची सोय करून दिली कोरोना काळामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ते शहर स्वच्छ करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कोरोना काळात साथ दिली.या काळात कामगारांसाठी औषध उपचार दवाखाना यासाठी आर्थिक सहकार्य देखील केले. सफाई कामगारांचे कामाव्यतिरिक्त ताण तणाव हलका करण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. शहराला स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या कार्यकाळ आमच्या स्मृतीत असेल अशा पद्धतीचे सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने अजय गोजरे मोतीलाल गोदरे कैलास कोचरे राकेश वाघ राजू चव्हाण सोनू गोदरे अनिल वाघ राहुल वाघ राकेश गोजरे राहुल चव्हाण अंकिश गोजरे, रवींद्र वाघ अजय वाघ गणेश खडसे महेंद्र वाघ यांनी कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते....
0 Response to "असा नगराध्यक्ष होणे नाही पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून नगराध्यक्षांसाठी निरोप समारंभ "
टिप्पणी पोस्ट करा