
तलावडी शिवारात बिबट्याचा मुक्त संचार ! जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी
तळोदा : तालुक्यातील तलावडी शिवारात बिबट्याचे मुक्त संचार सुरू असून दररोज शेतकऱ्यांना दर्शन होत आहे, आठवड्याभरात परिसरातील दोन बकऱ्या बिबट्याने फस्त केल्याची घटना घडली आहे. दरम्यान याबाबत संबंधी शेतकऱ्यांकडून पिंजरा लावण्याची मागणी होत आहे..
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल दिलीप पाटील, व सरदार पावरा यांचे तलावडी शिवारात शेत आहे. या शेतात मागील आठ दिवसांपासून बिबट्याने मुक्काम ठोकला आहे. या परिसरात असलेल्या शेतकऱ्यांच्या शेळ्या फस्त करण्याचा घटनेत वाढ झाली आहे. या परिसरात रात्री बेरात्री गहूला पाणी देण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाले आहे. बिबट्याचा भीतीमुळे या ठिकाणी रखवालदार देखील थांबत नसल्याने स्वतः मालकाला जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत आहे. संबंधित यंत्रणेने तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावून ठोस बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे..
0 Response to "तलावडी शिवारात बिबट्याचा मुक्त संचार ! जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी"
टिप्पणी पोस्ट करा