कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका वेळेत होणार : प्रशासक सचिन खैरनार
तळोदा : राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी निवडणुकीकरिता जाहीर कार्यक्रमानुसार नव्याने निवडून येणारे ग्रामपंचायत सदस्य हे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत मतदान करण्यापासून वंचित राहू नये. याशिवाय ग्रामपंचायतीचे नवीन निवडून येणाऱ्या सदस्यांची
नावे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मतदार यादीत समाविष्ट करून मतदार यादी अंतिम होईपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका स्थगितीसाठी राज्य सहकार प्राधिकरनाने केलेली विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मान्य करून बाजार समित्यांच्या निवडणुका दि.१५ मार्च २०२३ पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र तसे आदेश नंदूरबार जिल्ह्यातील संबंधित यंत्रणेला प्राप्त झाले नसल्याकारणाने निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. यात नंदुरबार जिल्ह्यातील नंदूरबार, तळोदा शहादा नवापूर अक्कलकुवा धडगाव यांचा देखील समावेश आहे. याकरिता संबधित प्रशासनाचा हालचाली गतिमान झाल्या आहेत. हरकती मागविण्यात आल्या असल्याची माहिती तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सचिन खैरणार यांनी दिली आहे. तसेच मा. राज्य सहकारी : निवडणुक प्राधीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे किंवा शासनाकडुन सदर निवडणुक स्थगितीबाबत सुचना प्राप्त झालेल्या नाहीत. सद्यथितीत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ६ कृ.उ. बाजार समित्यांची निवडणुक प्रक्रीया चालु आहे. सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल मापाडी व इतर सर्व नागरीकांना नोंद घ्यावी असे त्यांनी आव्हान केले आहे ..
0 Response to "कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका वेळेत होणार : प्रशासक सचिन खैरनार"
टिप्पणी पोस्ट करा