संपर्क करा

रा.काँ.पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

रा.काँ.पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

तळोदा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, पद्मविभूषण शरद पवार यांचा वाढदिवस तळोदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून  या क्रमाक्रमाने उपस्थिती राहण्याचे आव्हान शहर अध्यक्ष योगेश मराठे यांनी केले आहे. 

       सकाळी १० वाजून १० मिनिटांनी वाढदिसानिमित्त शंतीपाठ व केक कापला जाणार आहे. प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी, डॉ. पुंडलिक राजपूत, शहर अध्यक्ष योगेश मराठे, सौ सिंधुताई तुपकर महिला समन्वयक जिल्हा निरीक्षक, सौ अनिता परदेशी विभागीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रमुख उपस्थितीत  दिव्यांग बांधवांना सायकल वाटप, शेतीनिष्ठ शेतकरी सन्मानपत्र वाटप, १ लाख रकमेचे जीवन विमा सुरक्षा कवच, वाहनचालकांना प्रमाणपत्र वाटप, शहरातील भटके विभक्त समाजाचा व्यक्तींना ब्लॅंकेट वाटतय जननायक तंट्या मामा बिल समाज मंदिर चे लोकार्पण यावेळी होणार आहे. 
       कार्यक्रमाचे अध्यक्ष उदयसिंग पाडवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन होणार आहे. कार्यक्रमात संदीप परदेशी, हीतेंद्र क्षत्रिय, रामराव आघाडे, सौ. अनिता परदेशी याकुब पिंजारी, हे मार्गदर्शन करणार आहेत. सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे... या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या वाहन राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष योगेश मराठी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Response to "रा.काँ.पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article