
आगामी विधानसभा निवडणूक पिता विरुद्ध पुत्र असणार : रा. काँ.प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी
तळोदा : राष्ट्रवादी हा एक विचार असून तो विचार घेऊन माझाच मुलाचा विरोधात २०२४ ची निवडणूक लढवणार आहे, जर तुम्ही बापाचे नातं ठेवू शकले नाहीत तर आम्ही कशाला पुत्राचे नाते ठेवावे, ही निवडणूक आहे. हे राजकारण आहे आणि राजकारणात आणि प्रेमात सर्व माप असते. असे खळबळ जनक विधान करून आगामी निवडणूक पित्या पित्रात रांगण्याचे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आम. उदेसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसंगी केले..
तळोदा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालयाचा प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर
अध्यक्षा-उत्तर महाराष्ट्र विभागीय सौ अनिता परदेशीं, जेष्ठ नेते केसरसिंग क्षत्रिय, मा.जिल्ह्याध्यक्ष अल्पसंख्यांक सेल जाकीर मिया जहागीरदार, जिल्ह्याध्यक्ष सहकार सेल पुरषोत्तम चौहान, ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस एन.डी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष डॉ रामरावं आघाडे, डॉ.सेल प्रदेश सरचिटणीस डॉ.तुषार सनन्से, प्रल्हाद फोके, तालुका अध्यक्ष पुंडलिक राजपूत आदीजन उपस्थित होते..
उदेसिग पाडवी पुढे बोलताना म्हणाले की, वरिष्ठ नेत्यांकडून दादा आपला मुलगा आमदार आहे, तरी तुम्ही निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. हा बाप बेटांचा पक्ष नाही, राष्ट्रवादी हा विचाराचा पक्ष आहे, जर ते बापाचे नातं ठेवू शकले नाहीत तर मी कशाला पुत्राचे नाते ठेवावे, ही निवडणूक आहे. हे राजकारण आहे. ते बापाचे नात टिकवण्यात चुकलात आम्ही का टिकवावे असे सांगून आगामी निवडणूक पुत्र विरोधात लढण्याची घोषणा केली. मागील २०१४ ते १९ या कालावधीत मी नेतृत्व केले आहे, आगामी पालिकेचा निवडणुकीत मी आमदार होतो, त्यावेळी मी शहादा व तळोदा दोघे पालिका निवडून आणले, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गट असे चारही पक्ष एकत्रित येवून महाविकास आघाडीचा झेंडा पालिकेवर फडकविल्या शिवाय राहणार नाही. असे त्यांनी सांगितले,
तुषार सनन्से यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्याला राष्ट्रवादी पक्षाला संजीवनी देण्याचे कार्य तळोदा राष्ट्रवादी कडून होत आहे. भाजपात निष्ठावंताना न्याय दिला जात नाही. भाजपात इंकमिंग सूरू आहे. त्यामुळे अनेकजन राष्ट्रवादीचा संपर्कात आहेत. शहरात घरफोड्या वाढल्या आहेत, मूलभूत व स्थानिक प्रश्न सोडून केवळ धर्माचे राजकारण भाजपा तर्फे केले जात आहे.
सिंधुताई तुपकर यांनी भाजपावर टीका केली, त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्ष धर्माचे राजकारण करून दोन जतीमध्ये तेढ निर्माण करण्याचे कामे करत आहेत. त्यांच्याकडे कुठलेही विकासाचे व्हिजन नाही. विकासाच्या मुद्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी धर्माचे राजकारण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. केसरसिंग क्षत्रिय, संदीप परदेशी आदींनी मनोगत व्यक्त केले..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश मराठे यानी केले तर प्रास्ताविक शहर अध्यक्ष योगेश मराठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहर अध्यक्ष योगेश मराठे, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, राष्ट्रवादी युवा नेतृत्व संदीप परदेशीं, तळोदा शहादा विधानसभा पाडवी कुणाल पाडवी, जिल्हासरचिटणीस मंजुळा गावित,युवक तालुका अध्यक्ष कमलेश पाडवी,सरपंच सविता गावित, सरपंच प्रियंका पाडवी, सरपंच दीपक वळवी, अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस याकूब, अल्पसंख्यांक सेल तालुका अध्यक्ष आरीफ नुरा शेख, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष आदिल शेख, खजिनदार धर्मराज पवार,संघटक राहुल पाडवी,शहर उपाध्यक्ष गणेश पाडवी, अनिल पवार, गणेश राणे, नदीम बागवान, युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे,नितीन वाघ,हितेश राणे, शिवम शेंडे, शोभा क्षत्रिय, मोनाली पाडवी,गीता राणे,गायत्री क्षत्रिय, आदित्य इंगळे, योगेश खाटीक, अरविंद वळवी, विकास क्षत्रिय, इमरान सिकलिकर, प्रकाश पाडवी, नितीन मिस्त्री यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
*या कार्यक्रमांचे होते आयोजन*
शहरातील २३० वाहन चालकांचा सुरक्षिततेचा दृष्टिकोन ठेवत प्रत्येकी १ लाखाचा विमा काढून सुरक्षा कवच देण्यात आले. शहरातील प्रगतशील शेतकऱ्यांना फेटे बांधून शाल श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. दिव्यांग बांधवांस सायकल वाटप करण्यात आली. याशिवाय शहरातील भटके विभक्त समाजाचा व्यक्तींना ब्लॅंकेट वाटतय, जननायक तंट्या मामा बिल समाज मंदिराचे लोकार्पण यासह पक्ष प्रवेश आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते..
0 Response to "आगामी विधानसभा निवडणूक पिता विरुद्ध पुत्र असणार : रा. काँ.प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी "
टिप्पणी पोस्ट करा