संपर्क करा

१५ मार्च पावेतो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका स्थगित : औरंगाबाद उच्च न्यायालयाचा आदेश

१५ मार्च पावेतो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका स्थगित : औरंगाबाद उच्च न्यायालयाचा आदेश

तळोदा : (दि.७)           
                राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी निवडणुकीकरिता जाहीर कार्यक्रमानुसार नव्याने निवडून येणारे ग्रामपंचायत सदस्य हे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत मतदान करण्यापासून वंचित राहू नये. याशिवाय ग्रामपंचायतीचे नवीन निवडून येणाऱ्या सदस्यांची नावे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मतदार यादीत समाविष्ट करून मतदार यादी अंतिम होईपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका स्थगितीसाठी राज्य सहकार प्राधिकरनाने केलेली विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मान्य केली असून, बाजार समित्यांच्या निवडणुका दि.१५ मार्च २०२३ पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नंदूरबार जिल्ह्यातील ६ कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यभरातील बाजार समित्यांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत...

         तळोदा तालुका बाजार समितीसह  जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर डिसेंबर पर्यंत हरकती मागविण्यात आल्या व दि.२ डिसेंबरपर्यंत त्यावर निर्णय देण्यात आला. आता अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या. जानेवारी पासून प्रत्यक्ष निवडणुक कार्यक्रम सुरु होणार होता. या निवडणुकांसाठी दि.२९ जानेवारी २०२३ रोजी मतदान आणि ३० जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

    राज्य शासनाने बाजार समिती कायद्यात बदल करून शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत अभ्यास करून निवडणुक प्रक्रियेत दुरुस्त्या करण्यासाठी वेळ मिळावा तसेच सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरु असून नवीन निवडून येणारे ग्रामपंचायत सदस्य हे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूका पुढे ढकलण्याची राज्य सहकार प्राधिकरणने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विनंती केली होती. त्यावर खंडपीठाने नुकताच निर्णय देत बाजार समित्यांच्या निवडणुका दि. १५ मार्च २०२३ पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना संकटापासून लांबणीवर पडत असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांना सप्टेंबर २०२२ मध्ये मुहूर्त लागला होता. 

       राज्य सहकार प्राधिकरणाने राज्यातील ३१ डिसेंबरअखेर निवडणुकीस पात्र असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामुळे लांबलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून १ नोव्हेंबर २०२२ च्या पत्रान्वये राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केल्याप्रमाणे बाजार समितीच्या निवडणुका घेतल्यास, सध्या जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार नवीन निवडून येणारे ग्रामपंचायत सदस्य हे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून वंचित राहतील. त्यामुळे ग्रामपंचायतीचे नवीन निवडून येणारे सदस्य बाजार समितीच्या मतदारयादीत समाविष्ट करून मतदारयादी अंतिम होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यास परवानगी देण्याची मागणी राज्य सहकार प्राधिकरणने खंडपीठाला केली होती. ती मान्य करत न्या. मंगेश पाटील व न्या. वाय.जी. खोब्रागडे यांच्या खंडपीठाने बाजार समित्यांच्या निवडणुका दि. १५ मार्च २०२३ पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.


*या आहेत ६ बाजार समित्या*

           यासंदर्भात, औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशात बाजार समितीच्या निवडणुका 15 मार्च 2023 पर्यंत स्थगित करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जिल्हयातील नंदुरबार, तळोदा, शहादा, नवापूर, धडगाव,अक्कलकुवा या बाजार समित्यांसाठी निवडणुक प्रक्रीया सुरू झालेली होती. त्यावर हरकती देखील मागविण्यात आल्या होत्या. मात्र, निवडणुका स्थगित झाल्या आहेत....


प्रतिक्रिया : 
        निवडणूक प्रक्रियेत दुरुस्ती करण्यासाठी वेळ मिळावा, ग्रामपंचायतीत निवडून येणारे सदस्य बाजार समितीच्या मतदार यादी समाविष्ट व्हावे याकरिता औरंगाबाद खंडपीठाने १५ मार्च २०२३ पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.  पुढील आदेश येई पावेतो  निवडणुकाना स्थगिती देण्यात आले आहे... 

सुभाष मराठे 
सचिव कृ.उ.बा.समिती तळोदा

0 Response to "१५ मार्च पावेतो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका स्थगित : औरंगाबाद उच्च न्यायालयाचा आदेश"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article