
विविध मागण्यांसाठी किसान मोर्चाचे धरणे आंदोलन
तळोदा : राज्यात सरासरीपेक्षा सर्वाधिक पाऊस झाला असून नंदूरबार जिल्ह्यात देखील यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच परतीच्या पावसाने देखील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून राज्य सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा या सह विविध 15 मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने धरणे आंदोलन करीत राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.
तळोदा येथील प्रशासकीय इमारतीचा प्रवेशद्वारा जवळ महाराष्ट्र राज्य किसान सभा नंदुरबार च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्याच्या शेतमजूर, निराधार महिला-पुरुष, आदिवासी, दलित, महिला, भटके-विमुक्तांचे विविध प्रश्न, विविध मागण्या सोडवण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी किसान सभेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. सदर धरणे आंदोलन हे दिनांक 24 25 व 26 असे तीन दिवस चालणार आहे. या आंदोलनात नंदुरबार जिल्हा ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा, शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये अनुदान द्या, आदिवासी, कातकरी, भिल्ल ठाकर आणि भटके विमुक्त समाजाच्या वस्त्यांना पक्के रस्ते मिळावेत, या समुदायाला विविध शासकीय ओळखपत्रे आणि रेशनकार्ड मिळवीत, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व्हावी, हमीभाव हमी खरेदीचा केंद्राचा कायदा करा, ग्रामपंचायत धनपूर येथे तात्काळ नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करणे, धनपूर ते गायमुखी बोरवानी या रस्त्याचे काम सुरू करणे, बोरवान नदीवरील पुलाचे काम मंजूर करणे, रोजगार हमीचे कामे तात्काळ सुरू करणे,धनपूर ते छोटा धनपूर या रस्त्याचे काम सुरू करणे, टाकली नदीवरील पुलाचे काम मंजूर करणे, गायरान पडीक जमीन असणाऱ्यांचा नावे करण्यात यावी, धनपूर ते छोटा धनपूर या रस्त्याचे काम सुरू करणे, टाकली नदीवरील पुलाचे काम मंजूर करणे, गावरान पडीक जमीन असणाऱ्यांचा नावे करण्यात यावीत, शेतकऱ्यांचा सातबारा कर्जमाफी करून कोरा करा, धनपूर धरणाचे पाटचारी करून शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करा, शेतकऱ्यांचा शेती मालाला किफायशिर टिपायची भाव द्या व नुकसान झाल्यास भरपाई द्या अश्या विविध मागण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. सरकारचा निषेधार्थ घोषणाबाजी करत आंदोलन या ठिकाणी दिवसभर बसून होते.
0 Response to "विविध मागण्यांसाठी किसान मोर्चाचे धरणे आंदोलन"
टिप्पणी पोस्ट करा