हिंदूंना जागृत आणि संघटित करण्यासाठी रविवारी (दि.११) रोजी
तळोदा येथील माळी समाज मंगल कार्यालय येथे सायंकाळी ६ वाजता ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर सनातनचे संत सद्गुरू नंदकुमार जाधव, हिंदू जनजागृतीचे सुनील घनवट, रणरागिणी शाखेच्या कु.रागेश्री देशपांडे हे होते.
सर्व प्रथम आमदार राजेश पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, तळोदा शहराला विविध पुतळे उभारले जात आहेत. यामुळे शहराला इतिहासिक अशी एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा ध्यास आहे, लवकरच शहरात अश्वरूढ शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. आदिवासी हिंदू नाहीत असा होत असलेला प्रचार हा चुकीचा आहे. इतिहासात आदिवासींचे मोलाचे स्थान आहे. आदिवासी हिंदू नसल्याचा इतिहासात कुठेही उलेख आधळत नाही..
रागेश्री देशपांडे यांनी सांगितली की, भारताला आदर्श संस्कृती प्राप्त आहे. याठिकाणी स्त्रियांना पूजनीय मानले आहे, मात्र सद्या महिलांवर अत्याचारात वाढ झाली आहे. देशात बलात्काराचा तक्रारीत वाढ होत आहे. लव जिहाद नावाचे हिरवे संकट हिंदूचा दारात येवून पोहचले आहे, प्रेमाचे खोटे नाटक करून जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे, या माध्यमातून त्यांची लोकसंख्या वाढविले जात आहे. याचेच नाव लव जिहाद आहे....
हिंदू तरुणीचा बळी जात असताना लव जिहाद थांबत नाही. हिंदू संस्कृतीचा त्याग करून लव जिहादच्या बळी पडत आहेत, हिंदू मुलींना फसविण्यासाठी लाखो रू खर्च केले जात आहे.. चित्रपट सृष्टी ह्या लव जीहादाला खत पाणी घालत आहे.
हिंदू युवतींना जाळ्यात फसविण्यासाठी वशिकरणाचा प्रयत्न केला जात आहे. हिंदू मुलींनी स्व संरक्षण प्रशिक्षण शिकणे गरजेचे आहे. मुलींनी मेकप किट मध्ये सौंदर्य प्रसाधाना सोबत मिरचीचे पावडर ठेवा असे आवाहन केले. तरुणींनी प्रतिकार करण्याची शक्ती ठेवा, हिंदू जेव्हा जेव्हा एकत्रित आले तेव्हा तेव्हा इतिहास घडला आहे, हिंदूचा नसा नसा नसांध्ये कणा कणा मध्ये इतिहास रचण्याची ताकत आहे.
नंदकुमार जाधव यांनी सांगितले की,
जेथे लोक स्वधर्म रक्षणासाठी प्राणही देण्यास सिद्ध होते, तेथे आज आपल्या तरुणी एका आफताबसाठी आई-वडिलांना सोडून जात आहेत. आपल्या थोर पुरुषांच्या बलीदानाचे प्रतिदिन स्मरण करण्यासह त्याची हिंदूंच्या घराघरांमध्ये चर्चा झाली पाहिजे. फोनवर बोलताना हॅलो करण्याऐवजी जय श्री राम म्हणा, कुटुंबातील वाढदिवस हिंदू संस्कृती प्रमाणे साजरी करा, वाढदिवस दिनांक निहाय नव्हे तर तिथी नुसार साजरी करा, केक कापण्याची आपली संस्कृती नाही, मेणबत्ती पेटविण्याचा नव्हे तर दिवे लावण्याची आपली संस्कृती आहे.
आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपा शहर अध्यक्ष योगेश चौधरी, नगरसेवक जितेंद्र माळी, बब्बु माळी, माजी नगरसेवक पंकज राणे, माळी समाज अध्यक्ष अनिल माळी, यासह मोठ्या संख्येने हिंदू बांधव याठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदू जनजागृती समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
0 Response to "महाराष्ट्रात लव जिहाद कायदा व हिंदू राष्ट्र स्थापन करा :हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांचे आवाहन"
टिप्पणी पोस्ट करा