
सलसाडी फाट्याजवळ अपघातात : ६० वर्षीय वयोवृध्द गंभीर जखमी
तळोदा: सलसाडी फाट्या जवळ अज्ञात ईसमाने दुचाकी स्वारास ठोस दिल्याने ६० वर्षीय वयोवृध्द गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी साय. ०६.३० वाजेचे सुमारास सलसाडी फाट्याजवळ सार्व जागी अज्ञात चालकाने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करत वाहन भरधाव वेगाने चालवुन चुनिलाल सुपडया ठाकरे वय ६० वर्षे रा. सलसाडी ता. तळोदा यांच्या ताब्यातील हिरो सुपर स्पेंल स्पेलंडर कंपनीची मो.सा. क्रमांक एम.एच.३९.ए.जी. ६५९७ या वाहनाला ठोस दिली. या अपघातात चूनीलाल ठाकरे यास गंभीर दुखापती करून व मोटार सायकलचे नुकसानीस कारणीभुत होवुन अपघाताची खबर न देता पळुन गेला म्हणुन उमेश चुनिलाल ठाकरे यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात फौ.गु.र.नं.४५५/२०२२भा.दं.वि.क.२७९,३३७,३३८,४२७,१८४,१३४,१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास- मपोसई प्रिया वसावे हे करीत आहे...
0 Response to "सलसाडी फाट्याजवळ अपघातात : ६० वर्षीय वयोवृध्द गंभीर जखमी"
टिप्पणी पोस्ट करा