
संशयितरित्या तांदूळ वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला
तळोदा : अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर संशयास्पदरित्या तांदूळची वाहतूक करणारा ट्रक तळोदा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ट्रकमध्ये 25 टन तांदूळ असून वाहतुकी बाबत अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
याबाबत पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार,ट्रक क्रमांक एम एच 23 एयु 7400 हा तांदूळ घेऊन नांदेड येथून अहमदाबाद येथे जात होता.नंदुरबार जिल्ह्यात सध्या पोलिसांकडून 'मिशन ऑल आऊट' अंतर्गत गुजरात- महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागात नाकेबंदी सुरू आहे.गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास तांदुळची वाहतूक करणारा हा ट्रक अंकलेश्वर-बऱ्हाणपुर राज्य मार्गावर तळोदा शहरा नजीक असणाऱ्या फॉरेस्ट चेक पोस्ट नाक्यावर आला असता पोलिसांनी ट्रकची तपासणी केली.त्यात पोलिसांना अवैधरित्या तांदूळची वाहतूक होत असल्याचा संशय आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार यांनी हा ट्रक पोलीस ठाण्यात अधिक तपासासाठी आणला.त्याचे वजन केले असता त्यात 25 टन तांदूळ असल्याचे लक्षात आले. याबाबत गाडीचे चालक व मालक विचारणा केली असता.त्यांनी काही कागदपत्र व पावत्या पोलिसांना दाखवल्या मात्र त्यांच्या आधारावर पूर्णपणे तांदूळ ची केले जाणारी वाहतूक वैध व नियमांना अनुसरून आहे,हे स्पष्ट होऊ शकले नाही.शिवाय ट्रकमध्ये केली जाणारे तांदूळची वाहतूक मोठ्या प्रमाणात संशय निर्माण करणारी असल्याने पोलिसांनी हा ट्रक अधिक तपासासाठी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी पोलीस प्रशासनाकडून पुरवठा विभागाला पत्र पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
वाहनचा पंचनामा करण्यात आला ही गाडी व त्यातील माल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक अविनाश केदार, पोलिस नाईक दारासिंग पावरा, युवराज चव्हाण, अजय कोळी, अजय पवार, अजय कोळी, भाईदास पावरा, गणेश वसावे,मुकेश गाडीलोहार यांनी केली.
0 Response to "संशयितरित्या तांदूळ वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला "
टिप्पणी पोस्ट करा