चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची नियमित पदोन्नती न झाल्यास उपोषणाचा इशारा
तळोदा : आदिवासी विकास विभागातील अप्पर आयुक्त आयुक्त नाशिक यांच्या अधिनस्त प्रकल्प कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या नियमित पदोन्नती संदर्भात होणार्या अन्यायाबाबत राज्य सहकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने वेळोवेळी निवेदन देऊन सुध्दा अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याने उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
आदिवासी विकास विभागातील अप्पर आयुक्त नाशिक यांच्या अधिनस्त असलेल्या प्रकल्प कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची सन २०१३ ते २०१४ पासून नियमित पदोन्नती रखडली आहे. पदोन्नती संदर्भात अप्पर आयुक्त यांना वेळोवेळी निवेदने व प्रत्यक्ष भेटून पदोन्नती करण्याबाबत विनंती करूनही चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांना न्याय मिळाला नाही. तसेच आदिवासी विकास विभागाचे मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड के.सी.पाडवी यांना ही दोनदा निवेदने दिली. परंतू अद्याप ही कोणतीच कार्यवाही वरीष्ठ कार्यालय करीत नाही. तरी परत दि.२४ जून २०२१ रोजी मंत्री महोदय यांना निवेदन देऊन त्वरित कार्यवाही संदर्भात विनंती केली आहे. या अनुषंगाने त्वरित कार्यवाही झाली नाही तर कर्मचारी त्यांच्या रास्त मागणीसाठी नंदुरबार येथील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांना नाईलाजास्तव उपोषणास बसावे लागले असे राज्य सहकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने एका प्रसिद्ध पत्राद्वारे केली आहे....
0 Response to "चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची नियमित पदोन्नती न झाल्यास उपोषणाचा इशारा"
टिप्पणी पोस्ट करा