संपर्क करा

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय निवासी आश्रमशाळेत प्रवेश घेण्याचे तळोदा प्रकल्पचे आवाहन

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय निवासी आश्रमशाळेत प्रवेश घेण्याचे तळोदा प्रकल्पचे आवाहन

तळोदा: एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प तळोदा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षांसाठी शासनाकडून मंजूर होणाऱ्या लक्षांकाच्या अधिन राहून आदर्श आश्रमशाळा देवमोगरा ता.नवापूर या निवासी शाळेत इयत्ता 5 वीच्या वर्गात प्रवेशासाठी 30 जून 2021 पासून प्रवेश अर्ज वितरीत करण्यात येत आहेत.
                एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा, गट शिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र पंचायत समिती तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत अर्ज विनामुल्य मिळतील. परिपूर्ण भरलेला अर्ज 15 जुलै 2021 पर्यंत प्रकल्प कार्यालयातील शिक्षण शाखेत जमा करावेत.  त्यानंतर आलेले अर्ज स्विकारले  जाणार नाहीत.
              प्रवेशासाठी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीचा असावा. विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिंक उत्पन्न 1 लाखापेक्षा अधिक नसावे. अर्जासोबत सन 2020-2021 वर्षांचा उत्पन्नाचा दाखला जोडावा. प्रवेश परीक्षेत बसणारे विद्यार्थी हे 2020-2021 या शैक्षणिक वर्षांत इयत्ता चौथीत शासकीय, अनुदानित किंवा जिल्हा परिषद शाळेत शिकणारा असावा. विद्यार्थ्यांचे बोनाफाईड प्रमाणपत्र, इयत्ता चौथींमधील वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक  अर्जासोबत जोडावे. या प्रवेश प्रक्रियेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा यांनी केले आहे.

0 Response to "अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय निवासी आश्रमशाळेत प्रवेश घेण्याचे तळोदा प्रकल्पचे आवाहन"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article