``जून महिना बी उन्ह म्हाच ग्या' शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा
तळोदा: "जून महिना बी उन्ह म्हाच ग्या आते पेरण्या कव्हय करान्या, कपाशी कव्हय लाव्हानी" अशा विवंचनेमुळे शेतकरी कासावीस झाला असून जून महिन्यात देखील पेरणी योग्य पाऊस न पडल्याने चिनोदा परिसरातील शेतकरी चिंतातूर झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
साधारणतः जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर मका, कपाशी या पिकाच्या लागवडीला पोषक स्थिती मानली जाते. या महिन्यातील लागवड असेल तर उत्पादन चांगले येऊ शकते. अाता जून महिना सुध्दा लोटला तरी दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे मका, कपाशीच्या लागवडीसह सोयाबीन, तूर पेरणीस फटका बसण्याची शक्यता शेतकर्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान जून महिन्यात दोन ते तीन वेळा मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला मात्र तो पाऊस पेरणीस पोषक नसल्याचे काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नसल्याचे चित्र आहे. पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतिक्षा शेतकरी करत आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा बर्याच शेतकऱ्यांनी कापूस लागवड केलेली असून उर्वरित शेतकऱ्यांनी मात्र पेरणी साठी दमदार पाऊस झाला नसल्याने त्यामुळे अजून पेरणीसह कापूस लागवडही लांबणीवर पडली आहे. जो दिवस उगवतो तो ऊन, वारा वाहून निघून जात असल्यामुळे आता तरी दमदार पाऊस पडावा अशी अपेक्षा चिनोदा परिसरातील शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे.
0 Response to "``जून महिना बी उन्ह म्हाच ग्या' शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा "
टिप्पणी पोस्ट करा