कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष भरत माळी यांच्या हस्ते बीसीएम फिटनेस क्लबचे उद्घाटन
तळोदा : येथे शहादा रस्त्यावर उभारण्यात आलेल्या बीसीएम फिटनेस क्लबचे उद्घाटन अ.शि.मंडळ संचलित तळोदा कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भरत माळी व त्यांचे बंधूच्या हस्ते करण्यात आले.
तळोदा येथे बबनराव छगनराव माळी यांच्या नावाने शहादा रस्त्यावर साकारण्यात आलेल्या बीसीएम या फिटनेस क्लबचे उद्घाटन पी.ई. सोसायटी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणराव माळी, अ.शि.मंडळचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भरत माळी, नगरसेवक संजय माळी यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभात त्यांच्या मातोश्री श्रीमती विमलबाई माळी यांनी देखील ऑनलाईन उपस्थित लावली..
दरम्यान यावेळी बीसीएम जिमचे संचालक रोहन माळी यांच्या या फिटनेस क्लबला शुभेच्छा देण्यासाठी खासदार हिना गावित, जिप अध्यक्ष सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, माजी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी, माजी आमदार शिरीष चौधरी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, माजी आमदार उदेसिंग पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी, यांच्यासह नगरसेवक व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.
दरम्यान तळोदा शहरातील अत्याधुनिक सुविधा असलेली जिम तरुणांच्या सेवेत दाखल झाल्याने शहरातील पेहलवानीची परंपरा जपण्यास मदत होणार असून शरीर सुदृढतेसाठी महत्वाची ठरणार असल्याचे मते यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.....
0 Response to "कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष भरत माळी यांच्या हस्ते बीसीएम फिटनेस क्लबचे उद्घाटन "
टिप्पणी पोस्ट करा