तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तहसिलदार यांना निवेदन
तळोदा: माजी मंत्री एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबियांना ईडीमार्फत देण्यात येणारा नाहक त्रास तात्काळ थांबविणे बाबत तळोदा राष्ट्रवादी पार्टी प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी तळोदा तहसिलदार गिरीश वखारे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना राजकीय हेतूने ईडी सारख्या केंद्राच्या हातातील संस्थेचा वापर करून त्यांचा मागे चौकशीचा सासेमिरा लावण्यात येत आहे. माजी मंत्री तथा उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीत काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही अशाच प्रकारे नाहक त्रास दिला जात आहे.
भोसरी पुणे येथील जमिनी संदर्भात करण्यात आलेला संपूर्ण व्यवहार कायदेशीर असूनही एकनाथ खडसे यांचा या व्यवहाराशी संबंध जोडून चौकशीसाठी ईडीकडून नाहक त्रास दिला जात आहे. या भोसरी प्रकरणाची ४ ते ५ वेळा चौकशी झाली आहे. तत्कालीन सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती झोटिंग कमिटीने एकनाथ खडसे यांना चौकशीअंती क्लिनचिट दिलेली आहे. बंड गार्डन पोलीस स्टेशन पुणे, आयकर विभाग, अँटिकरप्शन विभाग आदी मार्फत चौकशी होऊन क्लोअर रिपोर्ट न्यायालयात सादर झालेला आहे. या विविध चौकशीमध्ये काहीही तथ्य आढळलेले नाही.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे हेतु पुरस्कर त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू असून हा संपूर्ण प्रकार निषेधार्थ आहे. त्यामळे एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबियांना ईडीमार्फत देण्यात येणारा नाहक त्रास तत्काळ थांबविण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष डाँ.रामराव आघाडे, केसरसिंग क्षत्रिय, संदिप परदेशी, हितेंद्र क्षत्रिय, भरत चौधरी, योगेश मराठे, धर्मराज पवार, संदिप वळवी, कमलेश पाडवी, नदिम बागवान, मुकेश पाडवी, गणेश पाडवी, अदिल शेख, चंद्रकांत भोई, प्रकाश मराठे, बबन पाडवी, जयेश जोहरी, विकास क्षत्रिय, इम्रान शिकलीकर, अरविंद वळवी, चेतन पाडवी, सुरेश पाडवी, कुणाल शिरसाठ, आदित्य इंगळे, किसन शिरसाठ, सोमनाथ चित्ते, सुदाम मोरे, अमरसिंग वळवी आदींच्या सह्या आहेत.
0 Response to "तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तहसिलदार यांना निवेदन "
टिप्पणी पोस्ट करा