संपर्क करा

गाईच्या गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत 2 वासरांचा होरपळून मृत्यू : लाखोंचे शेतीपयोगी साहित्य जळून खाक

गाईच्या गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत 2 वासरांचा होरपळून मृत्यू : लाखोंचे शेतीपयोगी साहित्य जळून खाक

तळोदा : अक्कलकुवा रस्त्यावरील चुणीलाल माळी यांच्या शेतात गाईच्या गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत 2 वासरू जळून खाक झाले असून गाय 50 टक्यापेक्षा जास्त जळाली आहे. शिवाय 2 लाख 75 हजाराचे शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे. 

          अक्कलकुवा रस्त्यावरील शेत शिवारातील चुनिलाल वंजी माळी यांच्या शेतातील गाईच्या गोठ्याला दि.१६ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे या आगीत दोन वासरू जळून खाक झाले असून एक गाय 50 टकेपेक्षा अधिक जळाली असून मृत्यूशी झुंज देत आहे. या शिवाय या आगीत शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.

           याबाबत अग्निशमन वाहिनीचे वाहन चालक यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून तातडीने पालिका प्रशासनाचे अग्निशमन वाहन त्याठिकाणी प्रचारण करण्यात आले या अग्नीवर ताबा मिळवण्यात त्यांना यश आला. दरम्यान तळोदा तलाठी डी.बी.चाटे यांनी कर्मचाऱ्यासोबत जाऊन रविंद रामदास मगरे, शैलेंद्र सूर्यवंशी, राजकपूर मगरे, राजेंद्र मगरे यांच्या उपस्थितीत गोठ्याचे मालक चुणीलाल वनजी माळी यांच्या गोठ्याच्या पंचनामा केला....

चौकट***
        या आगीत गायीचे मादी वासरू रक्कम 5000, नर वासरू 7000, लाकडी बैल गाडी रक्कम 20000, चारा कुटण्याचे मशीन 18000, 2 टन सुका चारा रक्कम 20000, शेड जळून खाक त्यात दरवाजे, लाकडी दांड्या, इत्यादि रक्कम 70000, नांगर वखर, पांम्बर, रेझर यासह शेती अवजारे रक्कम 25000, लोखंडी पत्रे 100 नग जळून खाक रक्कम 70000, मोठी गाय 40 टक्के जळून मृत अवस्थेत रक्कम 40000, असे एकूण 2 लाख 7 हजार रु रक्कमेचे नुकसान झाले आहे.....

0 Response to "गाईच्या गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत 2 वासरांचा होरपळून मृत्यू : लाखोंचे शेतीपयोगी साहित्य जळून खाक"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article