कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळात अन्य नऊ जणांचा समावेश
तळोदा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळात नऊ जणांचा प्रशासक म्हणून समावेश करण्यात आला आहे.यात माजी संचालकांचा समावेश असून महाविकास आघाडीच्या नेत्यांची वर्णी प्रशासक मंडळात अशासकीय सदस्यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान, त्यांनी पदभार स्वीकारला असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे
तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत एप्रिल २०१८ अखेर संपुष्टात आली होती. त्यानंतर व्यवस्थापकीय समितीला मुदतवाढ देण्यात आली होती.देण्यात आलेली मुदतवाढ संपल्यानंतर बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळात अशासकीय व्यक्तीच्या समावेश करण्याबाबत मान्यता देण्यात आली होती.त्यानुसार जानेवारी महिन्यात तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळावर नऊ जणांची अशासकीय सदस्यपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यान,जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नंदुरबार यांनी दि १२ जुलै रोजी पुरवणी आदेश निर्गमित करत अन्य नऊ जणांची बाजार समितीच्या प्रशासक मंडळात शासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.त्यात इतर अशासकीय सदस्यांमध्ये अमोल प्रल्हाद भारती, विजय भिकाजी सूर्यवंशी, सुरेश इंद्रजित,भरत मक्कन चौधरी, प्रल्हाद मोतीराम मराठे, राजेश तुकाराम पाटील, आकाश सतिष वळवी, महेंद्र हिरालाल बागुल, धनराज आनंदा मराठे यांचा प्रशासकीय मंडळांत समावेश आहे.
आज बाजार समितीचे मुख्य प्रशासक उदेसिंग पाडवी मुख्य यांच्या उपस्थितीत या प्रशासकांनी पदभार स्वीकारला आहे. दरम्यान,या अतिरिक्त नऊ जणांच्या नियुक्तीमागे महाविकास आघाडीच्या वरचष्मा प्रशासक मंडळावर दिसून आला आहे. नवनियुक्त प्रशासकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
0 Response to "कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळात अन्य नऊ जणांचा समावेश"
टिप्पणी पोस्ट करा